MB NEWS-बीड जिल्हयातील २०२० चा पिक विमा देण्यास विमा कंपनीस भाग पाडावे ! किसान सभेचे कृषी विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांना निवेदन

 

बीड जिल्हयातील २०२० चा पिक विमा देण्यास विमा कंपनीस भाग पाडावे !



किसान सभेचे  कृषी विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांना निवेदन

परळी वै.प्रतिनिधी...


      बीड जिल्हयातील २०२० चा पिक विमा देण्यास विमा कंपनीस भाग पाडावे या मागणीचे निवेदन मुंबई येथील मंत्रालयात सोमवारी (ता.२) राज्याचे कृषी विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांना दिले असल्याची माहीती किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे यांनी दिली आहे.



     बीड जिल्हयातील लाखो शेतकऱ्यांनी २०२० चा पिक विमा अग्रीकल्चरल ईन्शुरन्स कंपनीकडे आठशे कोटी रूपये विम्याच्या हप्त़्यापोटी रक्कम भरले हेते. केवळ 19 हजार शेतकऱ्यांना बारा कोटी रूपयाचा विमा कंपनीने मंजुर केला आहे. ज्या शेतकऱ्यांना विमा वाटप केला आहे.त्यांच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार पाठविली नाही या सबबीखाली विमा मंजुर केला नाही. बीड जिल्हयातील शेतकऱ्यांना नुकसानीचे अनुदान मिळालेले आहे. शासनाचा नुकसानीचा अहवाल असतानाही विमा कंपनी विमा नाकारत आहे. ही बाब शेतकऱ्यांचे आर्थीक नुकसान करणारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचा २०२० चा पिक विमा मंजुर करण्यास विमा कंपनीस भाग पाडावे या मागणीसाठी मुंबई येथे मंत्रालयात सोमवारी (ता.२) कृषी विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांची किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष कॉ. अजय बुरांडे यांनी भेट घेउन निवेदन दिले आहे. निवेदनात शेतकऱ्यांना विम्याचा लाभ न मिळाल्यास कोरोना काळात हजारो शेतकरी विमा कंपनीच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होतील असा ईशारा देण्यात आला आहे. कृषी विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांनी शेतकऱ्याच्या बाजुने सहानुभुती पुर्वक विचार करू असे आश्वासन दिले आहे. यावेळी डिवायएफआय चे कॉ. मोहन जाधव उपस्थीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार