MB NEWS-महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी संगमेश्वर फुटके यांची निवड ;ना.मुंडेंच्या हस्ते सत्कार

 

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी संगमेश्वर फुटके यांची निवड ;ना.मुंडेंच्या हस्ते सत्कार


परळी वैजनाथ दि.०२ (प्रतिनिधी)
             महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी येथील संगमेश्वर फुटके यांची निवड करण्यात आल्याबद्दल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
               महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या संपूर्ण महाराष्ट्रात सध्या नवीन नियुक्त्या करण्यात येत आहेत. यामध्ये येथील सामाजिक कार्यकर्ते संगमेश्वर नागनाथअप्पा फुटके यांची प्रांतिक तैलिक महासभेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी राधाताई फकिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संगमेश्वर फुटके यांनी शहर व तालुक्यात युवक संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य केले. जिल्ह्यातील पहिला वधूवर पालक परिचय मेळावा यशस्वी करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. तसेच कोरोना काळात समाजातील गोरगरीब लोकांना समाजातील दानशूरांना एकत्र करून मदत केली या कामाची दखल घेत निवड केली आहे. यासंदर्भात नुकतेच नियुक्ती पत्र प्राप्त झाले आहे. नियुक्ती केल्याबद्दल खासदार रामदास तडस, माजी उर्जामंत्री बावनकुळे, महासचिव भुषण कर्डीले, श्री.पन्हाळे, आमदार संदीप क्षिरसागर, विभागिय कार्याध्यक्ष प्रा.प्रविण फुटके यांनी अभिनंदन केले आहे. तर या नियुक्ती बदल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी (ता.०२) चेंबरी विश्रामगृहावर सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपालिकेचे गटनेते वाल्मिक कराड, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, दिपक देशमुख, चंदुरलाल बियाणी,रवि मुळे, छगन क्षिरसागर, युवानेते पवन फुटके आदी उपस्थित होते.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार