MB NEWS- खा.सुप्रियाताई सुळे व मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज मोफत डिजीटल श्रवणयंत्र (कानांच्या मशीन)चे होणार वाटप ; शिबीरास उपस्थित राहावे- डॉ. संतोष मुंडे

 खा.सुप्रियाताई सुळे व मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज मोफत डिजीटल श्रवणयंत्र (कानांच्या मशीन)चे होणार वाटप ; शिबीरास उपस्थित राहावे- डॉ. संतोष मुंडे





परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  खासदार सुप्रियाताई सुळे व  सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते 585 गरजू व्यक्तींनासाठी अंदाजे 25 हजार रुपये किंमतीच्या मोफत डिजिटल  श्रवणयंत्र (कानाची मशीन) वाटप शिबिराचे उद्घाटन आज शनिवार, 14 आँगस्ट रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. तरी पुर्व तपासणी झालेल्या रूग्णांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, धनंजय मुंडे आरोग्य मित्र  योजनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शिबीर संपर्क प्रमुख डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे. 



             शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराजरंग मंदिर येथे  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दि.14, 15 व 16 आँगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जिल्हा आरोग्य विभाग, बीड, नाथ प्रतिष्ठान, परळी वैजनाथ, धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व स्टारकी फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून 585 प्रत्येक व्यक्तीसाठी  अंदाजे 25 हजार रूपये किंमतीच्या मोफत डिजिटल श्रवणयंत्र (कनाची मशीन) वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीराचे उद्घाटन खा.सुप्रियाताई सुळे यांची आँनलाईन उपस्थिती व  पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ.शिवकन्याताई सिरसाट, जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, गटनेते वाल्मिक आण्णा कराड, नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विजय कानेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद काळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीडचे सचिन मडावी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष बाळासाहेब देशमुख, पंचायत समितीचे सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड. गोविंद फड,  उपजिल्हाधिकारी सौ.नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ, नगरसेवक चंदुलाल बियाणी,  जिल्हा परिषद सदस्य प्रा.मधुकर आघाव, नंदागौळचे सरपंच सुंदर गित्ते, माजी नगराध्यक्ष दिपक (नाना) देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली गडदे, संजय गांधी निराधार समितीचे चेअरमन राजाभाऊ पौळ, ज्येष्ठ नेते तुळशीराम पवार, सामाजिक न्याय विभागाचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. विनोद जगतकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सय्यद सिराज यांची उपस्थिती राहणार आहे. दिनांक 6 व 7 मार्च 2020  रोजी झालेल्या कर्णबधिर रुग्णांच्या मोफत डिजिटल श्रावण यंत्र वाटप पूर्व तपासणी शिबिरात परळी तालुका व परिसरातील सुमारे चारशे 1842 कर्णबधिर रूग्णांनी लाभ घेतला होता.  त्यामध्ये 585 कर्णबधिर मोफत श्रवणयंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. दि. 6 व 7 मार्च 2020 रोजीच्या शिबीरात तपासणी झालेल्या अशाच गरजुवंतांना मोफत श्रवण यंत्र वाटप करण्यात होणार  आहे. तरी  मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपाचा गरजुवंतांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शिबीराचे संपर्क प्रमुख डॉ. संतोष मुंडे (98222805) यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !