MB NEWS- ....म्हणून प्राचार्य,डॉ आर के इप्पर यांची निवड योग्य होती- दत्ताप्पा इटके

 ....म्हणून प्राचार्य,डॉ आर के इप्पर यांची निवड  योग्य होती-  दत्ताप्पा इटके



परळी वैजनाथ...... 

जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजचे प्रदीर्घ सेवेनंतर प्राचार्य, डॉ. आर. के.इप्पर यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जवहार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री जुगलकिशोर लोहिया,उपाध्यक्ष डॉ.दे. घ..मुंडे,सचिव दत्ताप्पा इटके गुरुजी,सहसचिव विजय वाकेकर, सत्कार मूर्ती डॉ आर. के. इप्पर सहपत्नीक व ज्येष्ठ संचालक बंकटराव कांदे, डॉ हरिश्चन्द्र वंगे, लक्ष्मीनारायण लाहोटी, प्रा. तानाजी देशमुख,शांतीलाल जैन, डॉ लोहिया,विठ्ठलअप्पा चौधरी,विलास बापू मुंडे, सौंदळे सर,काटकर सर,श्रीराम मुंडे, प्राध्यापक प्रतिनिधी प्रा डी. के. आंधळे,सतीश मुंडे, रमेशअप्पा मुंडे,पवन मोदानी, मेनकुदळे,यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव, श्री दत्ताप्पा इटके हे होते. डॉ. आर. के. इप्पर यांनी प्रदीर्घ सेवा केल्याबद्दल शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावल्याबद्दल  संस्थेच्या वतीने सह पत्नीक सत्कार केला. तसेच महाविद्यालयातील विभागांच्या माध्यमातून व बाहेरून आलेल्या मित्रांनी देखील महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. आर. के. इप्पर  यांचा सत्कार केला.या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य, डॉ. जे व्ही जगतकर यांनी केले. त्यांनी डॉ. आर. के इप्पर यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा आलेख सांगितला. डॉ. इप्पर सरांनी जवळपास 38 वर्ष शिक्षण क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केली आहे.त्यांच्या कार्याची पावती म्हणूनच आपले सभागृह भरगच्च भरलेले दिसून येत आहे असेही मत या प्रसंगी व्यक्त केले. त्यांची शैक्षणिक वाटचाल वसमत येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालय ते वैद्यनाथ कॉलेज अशी आहे. दोन्ही कॉलेजमधील डॉ इप्पर सरांच्या कार्याची माहिती या प्रसंगी सांगितली. त्यात प्रामुख्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्राची निर्मिती, बीसीए शिक्षणक्रमाला मान्यता, इंडोर -आउटडोरचे बांधकाम, मुलींचे वस्तीग्रह, सुसज्ज असे  ग्रंथालय ची निर्मिती प्राचार्य इप्पर यांच्या काळात झाली होती.  .तर संस्थेचे अध्यक्ष श्री जुगलकिशोर लोहिया यांनी प्राचार्य डॉ. इप्पर सरांनी महाविद्यालयातील शैक्षणिक कार्याची माहिती सांगितली. त्यांनी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात  ते यशस्वी ठरले आहेत. म्हणूनच त्यांची सेवा संपल्यानंतर ही आम्ही सर्व संचालक मंडळांनी त्यांना तीन वर्ष वाढवून महाविद्यालयांचा कारभार पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. पुढील काळात देखील त्यांनी आमच्यासोबत संचालक म्हणून  काम करावे असाही संदेश याप्रसंगी त्यांनी दिला. डॉ इप्पर सरांविषयी माजी प्राचार्य बांगड सर, शालिनीताई कराड, प्राध्यापक प्रतिनिधी प्रा.डी. के आंधळे, प्रा.एम एल देशमुख,डॉ.नयनकुमार आचार्य,प्रा. डी. जे वाघमारे, यांच्यासह इतर मान्यवरांनी डॉ. इप्पर  सर यांच्या कार्य, स्वभाव विषयी विचार व्यक्त केले.सत्काराला उत्तर देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. इप्पर  यांनी सुरुवातीलाच वैद्यनाथ कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली होती ती मी पार पाडली. या प्रसंगी साहेबांना स्मरण करून साहेबांचे आभार मानतो. ज्यावेळी लोकनेते गोपीनाथराव  मुंडे साहेबांनी मला प्राचार्य पद दिले तेव्हापासून ते आजतागायत पर्यंत महाविद्यालयातील शिक्षण क्षेत्राचा गुणात्मक विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे.त्यासाठी संस्थेचे पाठबळ माझ्या पाठीमागे असल्यामुळे तो विकास मी करू शकलो. आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्यामुळेच मला पुन्हा तीन वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली. ज्या  महाविद्यालयाचा कनिष्ठ विभाग भक्कम असतो, त्या महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभाग देखील भक्कम असतो असेही मत या प्रसंगी त्यांनी व्यक्त केले. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी वैद्यनाथ पॅटर्न लोकनेते गोपीनाथराव मुंडे  अकॅडमी व संस्था यांच्या माध्यमातून मी प्रयत्न केले आहेत. माझ्या शेवटच्या काळात अनेक अडथळे आली परंतु संस्थेचे संस्थेचे पाठबळ माझ्या पाठीमागे असल्यामुळे मी ती सहजरित्या पेलली. या महाविद्यालयाच्या प्रगतीचे श्रेय आणि शेवटी या संस्थेला देतो असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे सचिव श्री दत्ताप्पा इटके गुरुजी यांनी प्राचार्य, डॉ इप्पर सर यांचा सम्पूर्ण कौटोबिक परिवार उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब रत्नपारखी होते त्याप्रमाणे त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी रत्न निवडला. ते आज सेवानिवृत्त होत असले तरी संस्था सातत्याने त्यांचे मार्गदर्शन घेत राहील. त्यांनी महाविद्यालयात आणि शैक्षणिक उपक्रम राबवले त्यामुळे महाविद्यालयाचा कायापालट घडवून आणला.कॉपी मुक्त करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात प्रयत्न केले.त्यांनी 38 वर्षे सेवा सातत्याने केलेली आहे.ग्रामीण भागापासून ते प्राचार्य पदापर्यंत खडतर प्रवास  केला आहे. महाविद्यालयात त्यांनी सातत्याने राष्ट्रीय, राज्यपातळीवरील सेमिनारचे आयोजन करून विविध उपक्रम राबवले राबविण्यात ते यशस्वी ठरले आहेत महाविद्यालयातील काँक्रेट सिमेंटचे रस्ते व इतर भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी माजी मंत्री पंकजाताई मुंडे खासदार अमर साबळे साबळे, खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या अर्थसाह्यच्या माध्यमातून होत आहेत असे सांगून डॉ इप्पर सरांनी  राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी. राष्ट्रीय सेवा सल्लागार समिती, विद्यापीठ सिनेट वर निवड, मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष, प्राचार्य महासंघाचे यशस्वी अधिवेशन, अर्थशास्त्र विषयाचे संशोधन मार्गदर्शक म्हणून  अभ्यास विषयक कार्य, या कार्यामुळेच त्यांना दिल्लीच्या संस्थेने शिक्षणतज्ञ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. विद्यापीठ कमिटीवर देखील काम केले आहे.या कार्यक्रमाचे आयोजन संचालक व कार्यालयीन प्रमुख श्री रमेश फड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना चव्हाण यांनी केले तर आभार प्रा. उत्तम कांदे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्राचार्य, डॉ.    आर. के. इप्पर यांचा मित्र परिवार व कौटुंबिक परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !