MB NEWS-शिवसेना गणेशपार विभाग आयोजित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सर्व रोगनिदान व मोफत औषध उपचार शिबीराचा नागरिकांना लाभ

     शिवसेना गणेशपार विभाग आयोजित



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सर्व रोगनिदान व मोफत औषध उपचार शिबीराचा नागरिकांना लाभ



परळी वै:-

            शिवसेना गणेशपार विभाग व ना.धनंजय मुंडे आरोग्य मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त, मा.उपशहर प्रमुख सचिन स्वामी यांच्या संकल्पनेतून, भव्य रोगनिदान व मोफत औषध उपचार शिबीर गणेशपार विभागातील देशमुख गल्ली येथे सम्पन्न झाले.

      शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती पूजनाने करण्यात आली.

  यानंतर उपस्थित मान्यवर आरोग्य अधिकारी वर्ग यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. 



     या प्रसंगी बोलतांना कार्यक्रम अध्यक्ष शिव सेना उपजिल्हा प्रमूख अभयकूमार ठक्कर यांनी,पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब  यांच्या आदेशानुसार त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कसलेही झगमगाट, बॅनरबाजी न करता लोखंभिमुख कार्य केल्याबद्दल, शिवसेना गणेशपार विभाग शिवसैनिकांचे जाहीर कौतुक केले. तर प्रमुख पाहुणे जिल्हा नियोजन सामिती सदस्य वैजनाथ सोळंके यांनी सर्वांत शुभेच्छा दिल्या.

    या शिबिराचे मुख्य आयोजक मा.उपशहर प्रमुख बालासाहेब देशमुख यांनी शिबिराची रूपरेषा स्पष्ट करतांना, शिबिराला सहकार्य करणारे,ना.धनंजय मुंडे आरोग्य मित्र मंडळ, माजी नगराध्यक्ष भैय्या धर्माधिकारी यांचे विशेष आभार व्यक्त केले.

   या शिबिरात विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख अतुल दुबे,सतिष जगताप, गजानन कोकीळ,पत्रकार श्रीराम लांडगे, याची प्रमुख उपस्थिती लाभली होती.तर आरोग्यअधिकारी डॉ माया संमशेट्ये मॅडम,प्रशांत सोंनर,, रत्नाकर कुलकर्णी, गणेश वाळके,डॉ व्यंकटेश, डॉ परळीकर,व त्यांचे सर्व सहकारी यांचे तपासणी शिबिरात योगदानाबद्दल, माजी शिवसेना जेष्ठ नेते नारायणराव सातपुते, माजी शहर प्रमुख भोजराज पालीवाल,विभाग प्रमुख संजय कदम, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     या आरोग्य तपासणी रोगनिदान मोफत औषध उपचार शिबिर यशस्वी करण्यासाठी, विभाग प्रमुख संजय गावडे,रमेश दादा लोखंडे,पांडुरंग जाधव,परशुराम उर्फ बबन गिरी,संतोष साखरे,राजाभाऊ देशमुख,नारायण देशमुख,सचिन देशमुख,धनंजय लोखंडे,वैजनाथ देशमुख, नवनाथ लोभे,ओमकार जाधव,संतोष आमले, विकास कदम,सतिष कदम,अनिता पवार,साधना मानकर,महादेवी स्वामी,स्वाती स्वामी,या सह असंख्य नागरिक उपस्थित होते.

   या आरोग्य शिबिरात 238 पेक्षा अधिक रुग्ण तपासणी करून ज्यांना आवश्यक आहे, त्यानां मोफत औषधे देण्यात आली.

       या कार्यक्रमाचे  प्रस्ताविक मा.उपशहर प्रमूख सचिन स्वामी यांनी,सूत्रसंचालन सुनिल देशमुख सर,तर आभार प्रदर्शन माजी उपशहर प्रमूख नरहरी सूरवसे यांनी केले .

      

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार