*एसटी कामगारांचे परळीत जोरदार आंदोलन ; कुटुंबियांसह काढला मोर्चा (VIDEO NEWS)*
परळी वैजनाथ, प्रतिनिधी :
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच असुन प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज परळीत जोरदार आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न कामगारांनी केला.शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांच्या वतीने व्यक्त करण्यात आला. परळीत आज एसटी कामगारांच्या कुटुंबियांसह मोर्चा काढण्यात आला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन सुरू आहे. वार्षिक वेतन वाढीचा दर तीन टक्के करावा, राज्य सरकारप्रमाणे देय महागाई भत्ता अदा करावा ,राज्य सरकारप्रमाणे देय घर भाडे अदा करावे, सण उचल म्हणून बारा हजार पाचशे रुपये दिवाळीपूर्वी अदा करावी , पंधरा हजार रुपये बोनस मिळावा या मागणीसाठी एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. आता शासनात विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.या अनुषंगाने आज परळीत मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न कामगारांनी केला.
🕳️ VIDEO 🕳️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा