MB NEWS-*पंकजाताई मुंडे यांचे अर्थपूर्ण कलात्मक ट्विट: "थोडासा कंटाळवाणा प्रवास पण सुंदर सूर्योदय"..........!*

पंकजाताई मुंडे यांचेअर्थपूर्ण कलात्मक ट्विट :"थोडासा कंटाळवाणा प्रवास पण सुंदर सूर्योदय " ..........!

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      नेहमीच काही तरी विशेष व अनोखी संकल्पना मांडणाऱ्या भाजपनेत्या पंकजाताई मुंडे यांच्यातील कलात्मक व्यासंगी व्यक्तिमत्वाची छाप अनेक प्रसंगातुन दिसते. पंकजाताई मुंडे या आज दि.११ रोजी पाथर्डी दौऱ्यासाठी निघाल्या.पहाटेच अंधारात निघाल्या. प्रवासा दरम्यान त्यांनी सुंदर सूर्योदयाचे छायाचित्र टिपले व त्या छायाचित्राला अतिशय अर्थपूर्ण ओळी जोडत ते ट्विट केले आहे.यामधुनही राजकीय व्यक्तीमत्त्वा पलिकडच्या, कलात्मक - व्यासंगी व्यक्तिमत्वाची झलक बघायला मिळाली.पंकजाताई मुंडे यांचे  हे अर्थपूर्ण कलात्मक ट्विट असुन 'थोडासा कंटाळवाणा प्रवास पण सुंदर सूर्योदय..........!' असा सुंदर मतितार्थ लक्षवेधी ठरणारा आहे.

     भाजप नेत्या पंकजा मुंडे या जशा 'मासलिडर' आहेत त्याचप्रमाणे त्यांच्यातील कलात्मक व्यासंगी व्यक्तिमत्वही वेळोवेळी दिसून येते.आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाची मोहीनी लाखो समर्थकांवर आहेच. भाषणातील शेरोशायरी असो की काव्यपंक्तीचा वापर, महाभारतातील प्रसंगांची सध्यस्थितीत घातलेली गुंफन असो की आपल्या समर्थकांना घातलेली लिखित संदेश साद- या सगळ्यात त्यांच्या साहित्यिक, कलात्मक, व्यासंगी व्यक्तिमत्वाची छाप दिसून येते. नेहमीच काही तरी विशेष व अनोखी संकल्पना मांडणाऱ्या पंकजाताई यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या लाॅकडाऊन परिस्थितीत आपला चित्रकलेचा व्यासंग विकसित केला .त्यापुर्वीही त्यांनी रेखाटन केलेल्या चित्रावरुन मोठी चर्चा घडली होती.श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार्श्वभुमीवर पंकजाताईंच्या भावविश्वातील प्रभु श्रीरामाचे सुरेख व विलोभनीय साकारलेले चित्र सर्वांच्या पसंतीस उतरले होते. राजकारणाच्या प्रचंड व्यस्त दैनंदिनीत व्यासंग जपायला वेळ मिळु शकत नाही.पण त्यातुनही अनेक प्रसंगातुन त्यांच्यातील कलात्मक व्यासंगी व्यक्तिमत्वाची छाप दिसून येते.

 सुर्योदयाच्या छायाचित्रासह पंकजाताईंचे ट्विट......

  "दौऱ्यासाठी पहाटे अंधारात घरातून निघाले जागरण आणि मोठा प्रवास थोड़ा कंटाळा होता मनात पण रस्त्यात इतका सुंदर सूर्योदय पाहायला मिळाला... ऊर्जा द्विगुणित झाली..आता मोहटा देवीच्या आणि लोकांच्या दर्शनाने 100 पटीने उत्साह वाढेल" असे अर्थपूर्ण पंकजाताईंचे ट्विट लक्षवेधी ठरले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार