MB NEWS- *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्यपदी प्रा. अतुल दुबे*

 *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्यपदी प्रा. अतुल दुबे*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी

      येथील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्यपदी अतुल दुबे  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना.धनंजय मुंडे,सहसचिव प्रदीप खाडे यांनी नवनियुक्त प्राचार्य अतुल दुबे  यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या नियुक्ती बदल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

    प्रा.अतुल दुबे  हे परळी शहरात सर्व परिचित व्यक्तीमत्व आहे. शहरातील एक अभ्यासू, उपक्रमशील व संवेदनशील क्रीडा शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.गेल्या अनेक वर्षांपासून विविध ठिकाणी त्यांनी अध्यापन सेवा बजावत अनेक विद्यार्थी घडवले आहेत.  कर्तव्यदक्ष क्रिडाशिक्षक म्हणून त्यांची आजपर्यंत वाटचाल राहिलेली आहे. विद्यार्थी केंद्रित सेवा हे त्यांचे वैशिष्ट्य राहिलेले आहे.सर्व सहकारी शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी प्रिय असा  प्राचार्य त्यांच्या माध्यमातून संस्थेला लाभला आहे. शाळा व महाविद्यालयाची  गुणवत्तेची परंपरा कायम ठेवून सर्वांचे सहकार्य, संस्था अध्यक्ष ना.धनंजय मुंडे,सहसचिव प्रदीप खाडे व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तेचा आलेख  आणखी वाढवून विद्यार्थ्यांना  दर्जेदार, गुणवत्ता पूर्ण शिक्षण देवून गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्नशील राहिल अशी ग्वाही या नियुक्ती नंतर प्राचार्य अतुल दुबे  यांनी दिली.त्यांच्या नियुक्ती बदल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार