परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-*कार्तिक मासानिमित्त आयोजित नवकुंडी शतचंडी यागाची संत महंतांच्या उपस्थितीत पुर्णाहूतीने सांगता* 🕳️ *ज्योतिर्लिंगक्षेत्रात शतचंडी यागाचा लाभ ही मोठी उपलब्धी- जगद्गुरु शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी*

 कार्तिक मासानिमित्त आयोजित नवकुंडी शतचंडी यागाची संत महंतांच्या उपस्थितीत पुर्णाहूतीने सांगता

🕳️ ज्योतिर्लिंगक्षेत्रात शतचंडी यागाचा लाभ ही मोठी उपलब्धी- जगद्गुरु शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी


परळीवैजनाथ, प्रतिनिधी....

       धर्मशास्त्रात शतचंडी यागाला विशेष महत्त्वआहे. कार्तिक माहात्म्य मोठ्या प्रमाणावर असून या पर्वणीत विविध धार्मिक विधी व साधनांना अतिशय महत्त्व आहे. या अनुषंगाने ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी वैजनाथ येथे नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन ही मोठी उपलब्धी असल्याचे प्रतिपादन संकेश्वर मठाचे जगद्गुरु शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी यांनी केले.परळीत कार्तिक मासानिमित्त आयोजित नवकुंडी शतचंडी यागाची संत महंतांच्या उपस्थितीत पुर्णाहुतीने सांगता झाली याप्रसंगी आशिर्वचनपर मनोगतात ते बोलत होते.    

      बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत परळी वैजनाथ येथे पवित्र कार्तिक मासानिमित्त नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक पर्वणीचा लाभ भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने घेतला. वैद्यनाथ मंदिरच्या बाजूला वक्रेश्वर मंदिर येथे १६ नोव्हेंबर रोजी या  सोहळ्याची पुर्णाहुती झाली. जगद्गुरू शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी महाराज संकेश्वर मठाचे शंकराचार्य यांच्या उपस्थितीत नव कुंडी याग हवन, शत चंडी हवन करण्यात आले.यावेळी सर्वाना स्वामीजीनी आशिर्वाद दिले.

      कार्यक्रमा ची सांगता महाआरती व महाप्रसादाने करण्यात आली.या वेळी स्वामींच्या पादुका व यथोचित सत्कार  पंडित नितीन राजुरकर यांनी केला.कार्यक्रमाचे यजमान पद श्री.व सौ.प्रदीप प्रदीप देशमुख, श्री.व सौ.रघुवीर मालक देशमुख ,श्री.व सौ.शरदराव मोहरीर, श्री.व सौ.तेजस सेठ सोमाणी, श्री.व सौ.सतीशराव मुंडे,  श्री.व सौ.रणजित भोईटे,श्री.व सौ. बाबुराव गडगुळ ,श्री.व सौ.हरिभाऊ  धर्माधिकारी, श्री.व सौ.गणेश टिंबे, श्री.व सौ. ओमप्रकाश बियाणी,  श्री.व सौ.गोविंद सेठ बंग,श्री.व सौ.सूर्यकांत कातकडे ,श्री व सौ. रमेशराव धर्माधिकारी,  श्री.व. सौ.अँड. गिरीश राजुरकर, यांनी भूषवले.

             पाच दिवस संपन्न झालेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिले.यामध्ये प.पु.यज्ञेशवर सेलुकर महाराज, पशुपतीनाथ चे प.पु. डॉ. अलोकनाथ महाराज,भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, जेष्ठ नेत्या सुदामतीताई गुट्टे,  सिक्कीम चे. श्री. व सौ. बी.के.राय, माजी नगराध्यक्ष श्री.बाजीराव  धर्माधिकारी, डॉ. शालिनी ताई कराड, डॉ.राजाराम  मुंडे आदींनी उपस्थितीत राहून पुजा व आरती केली, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश पारगावकर,  शिरीष राजुरकर, प्रदीप आण्णा आग्नीहोत्री, विलास माळपांडे, सुरेश राजुरकर, व पुरोहित मंडळी यांनी परिश्रम घेतले..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!