MB NEWS- ⬛ *नौकरी लावतो म्हणून पुण्याहून आणले परळीला व दोन दिवस केला इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार* 🕳️ *सोलापूरच्या ३८ वर्षिय महिलेची परळीच्या २४वर्षिय युवकाविरुद्ध फिर्याद दाखल*

 ⬛ नौकरी लावतो म्हणून पुण्याहून आणले परळीला व दोन दिवस केला इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार

🕳️ सोलापूरच्या ३८ वर्षिय महिलेची परळीच्या २४वर्षिय युवकाविरुद्ध फिर्याद दाखल

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....     

     परळीत नौकरीला लावतो, रूम बघून देतो असे म्हणून सोलापूरच्या एका ३८ वर्षिय महिलेला पुण्याहून परळीला घेऊन येऊन तिच्यावर इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी परळी शहर पोलिसात परळीच्या एका २४ वर्षिय युवका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरोपी परळी येथील रहिवासी गणेश बाबुअप्पा कोडी वय 24 वर्षे राहणार जंगम गल्ली, गणेशपार, परळी वैजनाथ याने सोलापूर येथील रहिवासी असलेल्या ३८ वर्षीय महिलेला पुण्याहून परळीला आणले. परळी येथे तुला नौकरी लावून देतो असे अमिष दाखवुन तो तिला परळीला घेऊन आला असे या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. परळीत आल्यानंतर रूम बघून देतो असे म्हणून दिनांक 19 रोजी रात्री व दि.२० रोजी दुपारी बळजबरीने इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार केला. कोणास सांगितल्यास तुला परळीच्या बाहेरही जाऊ देणार नाही तसेच इथेच मारुन टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिली.या महिलेच्या फिर्यादीवरून याप्रकरणी  परळी शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६, ५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि पेंटकर हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार