MB NEWS-शिक्षणप्रेमी स्व. शामरावजी देशमुख

 शिक्षणप्रेमी स्व. शामरावजी देशमुख 


           कै. लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय परळीचे संस्थापक अध्यक्ष स्व. शामरावजी देशमुख यांचा आज  22  नोव्हेंबर रोजी स्मृतीदिन. या निम्मीताने संस्थेच्या वतीने भव्य असा तीन दिवसीय स्मृतीसमारोह आयोजित करण्यात आला असून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद  येवले यांच्या हस्ते या स्मृतीसमारोहाचे उद्घाटन होणार आहे. 

       कै. लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाची मुहूर्तमेढ रोवणारे स्व. शामराव संतुकराव देशमुख हे परळी पंचक्रोशीत एक सामाजिक आणि दुसरे सांस्कृतिक क्षेत्रात दानशूर व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. नव्या पिढीला कदाचित हा इतिहास माहिती नाही. परंतू हे वास्तव आणि सत्य आहे. परळी शहरात शिक्षणाची गंगा यावी. शिक्षण हे सर्वसामान्य बहुजन समाजापर्यंत पोहोचावे यासाठी त्यांचे योगदान विसरता येणार नाही. 

       मराठवाडा हा 17  सप्टेंबर  1948  पर्यंत निजामाच्या अखत्यारीत होता. त्यामुळे सहाजिकच मराठवाड्यात निजामाचे राज्य होते. त्याचेच कायदे कानून इथे लागू होते. त्यावेळेस परळी शहर आजच्या एवढे मोठे नव्हते परंतू एक प्रमुख बाजारपेठ होती. परळी शहरात जवळपास पन्नासच्या आसपास जिनिंग आणी ऑईल मिल होत्या. भुईमूग आणि कापसाचे परळी आणि परिसरात मोठे उत्पादन होत असे. त्यामुळे मुंबई,  हैद्राबाद येथील व्यापारी परळीला येत. या व्यापाराचे महत्त्व लक्षात घेऊन निजामशाही राजवटीत बीड जिल्हयात फक्त परळीलाच रेल्वे आली. आज तिचा विस्तार झालेला पहावयास मिळतो. 

   व्यापाराबरोबर शिक्षणही तितकेच महत्वाचे आहे हे लक्षात घेऊन स्व. शामराव देशमुख यांनी आजची जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आणि त्याकाळी असणारी निजामची सरकारी शाळा जी पूर्वी वाकेकर यांच्या वाड्यात भरत होती. त्या शाळेसाठी स्वताची पाच एकर जमीन दान दिली. याच दान दिलेल्या जागेवर पुढे  1935  मध्ये भव्य बांधकाम असलेली जिल्हा परिषद हायस्कूल परळीकरांसाठी सुरू झाली. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण याच शाळेत झाले. तर प्रमोद महाजन यांचे वडील काही काळ या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. 

      आज शहरात अनेक शैक्षणिक संस्था. अनेक खाजगी शाळा, अनेक इंग्रजी शाळा आपणाला दिसत आहेत. पण मराठवाडा पारतंत्र्यात असताना शहरात वैद्यनाथ विद्यालय आणि जिल्हा परिषद या दोनच शाळा होत्या. आणि सर्व विद्यार्थ्यांना उर्दू माध्यमातून शिक्षण घ्यावे लागत होते. आणि महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी हैदराबाद येथे जावे लागत होते. मराठवाडय़ातील विद्यार्थ्यांना मराठीतच शिक्षण मिळावे हाही शाळेसाठी जागा दान देताना शामराव देशमुख यांचा उद्देश होता. 

        एवढेच नाही तर थोर महापुरुष शिक्षण हे खऱ्या अर्थाने गोर गरीब. बहुजन, महिला यांच्या पर्यंत पोहचण्यासाठी आद्य क्रांतिकारक महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी रामानंद तीर्थ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्व. शामराव देशमुख यांनी स्वता कै. लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. 

     या शिक्षण मंडळाचे महिला महाविद्यालय आज परळी शहर आणि परिसरासाठी ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. महाविद्यालयीन मुलींना काॅलेजला जातांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. अनेक मुलींना महाविद्यालयात छेडछाडीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. तसे होऊ नये. त्यांना मुक्त आणि आनंदी वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी परळी तालुक्यातील एकमेव कै. लक्ष्मीबाई महिला महाविद्यालय विद्यार्थिनींना सुरक्षित वाटते. आणि गुणवत्तेच्या बाबतीतही महाविद्यालय विद्यापीठात आघाडीवर आहे.  

     आपल्या वडिलांचे कार्य आणि स्वप्न पूर्ण करून ते पुढे नेण्याचे काम आज त्यांची मुले तितक्याच जोमाने करतांना दिसत आहेत. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष संजय देशमुख, जेष्ठ मार्गदर्शक अनिल देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख संस्था नावारूपास आणत आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थिनींना सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहेत. याला महाविद्यालयाच्या तज्ज्ञ प्राध्यापकांचेही सहकार्य मिळत आहे. 

            22  पासून सुरू होणाऱ्या स्व. शामराव देशमुख स्मृतीसमारोहात परळीकरांना व्याख्यान, संगीत, आणि निमंत्रित कवींच्या कवी संमेलनाची मेजवानीच मिळणार आहे. तसेच विविध शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परळीकर याचा निश्चितच लाभ घेतील यात शंका नाही. हा स्मृतीसमारोह यशस्वी करण्यासाठी कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एल. एस. मुंडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डाॅ. विनोद जगतकर, स्मृतीसमारोह समन्वयक प्रा. डाॅ. राजकुमार यल्लावाड, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. 

      

                      रानबा गायकवाड 

                       9420148538

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !