MB NEWS-ओबीसी आरक्षण संरक्षणाबाबत राज्य सरकारने पाठीत खंजीर खुपसला -पंकजा मुंडे

 ओबीसी आरक्षण  संरक्षणा बाबत राज्य सरकारने पाठीत खंजीर खुपसला -पंकजा मुंडे

मुंबई : एमबी न्युज वृत्तसेवा....

       प्रत्‍येकवेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवू नका.    इम्‍पोरिअल डेटासाठी राज्‍य सरकार निधी उपलब्‍ध करुन देत नाही. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, अशी राज्‍य सरकारची मानसिकताच नाही. राज्‍य सरकारने ओबीसी समाजाच्‍या पाठीत खंजीर खूपसला आहे. ,अशा शब्‍दात भाजप नेत्‍या पंकजा मुंडे यांनी आज राज्‍य सरकारवर हल्‍लाबोल केला. त्‍या पत्रकार परिषदेत बोलत होत्‍या.

  

      इम्‍पोरिअल डेटासाठी राज्‍य सरकार निधी उपलब्‍ध करुन देत नाही. राज्‍य सरकारला ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवायचे आहे का, शेतकर्‍यांना पीक विमा दिला जात नाही. अतिवृष्‍टीग्रस्‍तांना सरकारने कोणती मदत केली. संकटात असणार्‍या शेतकर्‍यांकडून सक्‍तीची वीजबिल वसुली का सुरु आहे, असे सवालही पंकजा मुंडे यांनी केला.ठाकरे सरकारमध्‍ये समन्‍वयाचा अभाव दिसून येत आहे. राज्‍य सरकारमध्‍ये विसंवाद असल्‍याने याचा फटका राज्‍यातील सर्वसामान्‍य नागरिकांना बसत आहे, अशी टीकाही त्‍यांनी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार