परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-⬛ *आजचे राशिभविष्य* ⬛ *दि.१९ नोव्हेंबर २०२१*

 ⬛ आजचे राशिभविष्य ⬛

   दि.१९ नोव्हेंबर २०२१

   


                    

मेष- वस्तू हरवण्याची शक्यता आहे. सावधानता बाळगा. कर्ज काढावे लागेल. काटकसर महत्त्वाची. मनाविरुद्ध घटना घडतील. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे.


वृषभ- उत्साह वाढवणार्‍या घटना घडतील. धार्मिकता वाढेल. मित्रमंडळींचा सहवास आनंददायी होईल. प्रलंबित कामांत प्रगती होईल.


मिथुन- आजचे काम उद्या करू, या वृत्तीमुळे आर्थिक व मानसिक ताण निर्माण होण्याची शक्यता. नियोजनाअभावी कामे रखडतील. आळस सोडायला हवा.


कर्क- प्रेम प्रकरणात यशप्राप्ती. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आर्थिक प्रश्न सुटतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यामध्ये दिवस जाईल.


सिंह- मनासारख्या घटना घडतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अधिकारामध्ये वाढ होईल. वाडवडिलांची पुण्याई उपयोगी पडेल.


कन्या- सरकारी कामांमध्ये अडचणी येतील. छातीशी संबंधित आजार उद्भवतील. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक. नियमांचे पालन आवश्यक आहे.


तूळ- श्वसनासंबंधित विकार होण्याची संभावना. अस्वस्थता राहील. प्राणायाम व योग साधनेची गरज. वादविवादापासून दूर राहावे. मनाविरुद्ध घटना घडतील.


वृश्चिक- प्रवासातील अनुभव सुखद आनंद देतील. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. प्रवासाचे योग संभवतात.


धनु- सत्संगामध्ये दिवस जाईल. मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहील. आर्थिकद़ृष्ट्या लाभदायक दिवस. शत्रू पीडा कमी होईल. पदोन्नतीचे योग संभवतात.


मकर- खरेदीचा मोह नुकसान करणारा. देणीदारांकडून त्रास होईल. सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील. कौटुंबिक कलह टाळावा. संयमाने वागावे लागेल.


कुंभ- चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. संयम आवश्यक आहे. प्रवासात सावधानता आवश्यक आहे.


मीन-कर्तव्यदक्ष स्वभावामुळे कौतुक होईल. आवडत्या व्यक्तींबरोबर संवाद होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!