MB NEWS- *ध्येयनिष्ट ध्येय पथिक...शामरावजी देशमुख*

 ध्येयनिष्ट ध्येय पथिक... शामरावजी देशमुख*

.........................स्व.शामरावजी देशमुख- -स्मृती समरोह निमित्याने आयोजित भरगच्च कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका मिळाली.त्यात लिहलं आहे,कौटुंबिक विकासापेक्षा संस्थेचा विकास श्रेष्ठ मानून व मुलींचे उच्च शिक्षण हे ध्येय निश्चित करून ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं अशा ध्येयासक्त व्यक्तीश्रेष्ठाच्या विचारांचा जागर घालण्या साठी...

ते वाचून ,ती निमंत्रण पत्रिका पाहून मला स्व. शामरावजी देशमुखांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची प्रेरणा मिळाली.श्री संजयजींनी ही तशी इच्छा व्यक्त केली....

म्हणून स्व.शामरावजींना आदरांजली म्हणून ही शब्दपुष्पांजली .

महिला उच्च शिक्षणाचे उद्दिष्टं स्वतःपुरते पक्कं करून,ज्यांनी निष्ठापुर्वक दमदार पावलं टाकली व अल्पावधीत ,प्रामुख्याने शहरासाठी व सर्व साधारणपणे मराठवाड्यात आदर्श ठरावे असे महिला ज्यूनिअर व वरिष्ठ महाविद्यालय उभे केले ,अशा व्यक्तीश्रेष्ठाचे कार्य जमेल तसे शब्दबध्द करण्याचा प्रयत्न..

शहराच्या केंद्रस्थानी कोट्यावधीचे मुल्य असलेल्या आपल्या जागेत ,शामरावजींनी या लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची संस्थापना केली व आज शहराची ओळख ठरावी इतके विकसित झाले आहे.

एक विचारवंत म्हणतो, " Society comes into being for the sake of life and continues its existance for the sake of good -n-better life."

तव्दतच या महाविद्यालयाची वाटचाल उत्कृष्टते कडे चालू आहे.त्याचे सारे श्रेय स्व. शामरावजींना जाते..

त्यात कुणी वाटेकरी असण्याचे कारण नाही.त्यात कुणी भागीदार असेलच तर त्यांच्या घराण्याची दातृत्वशाली परंपरा.

आज ज्या जागेवर जिल्हा रूग्णालय ,स्टेट बॅन्क व जि.प. प्रशाला आहे ती मध्यवर्ती जागा त्याकाळी जिल्हा परिषदेला यांनीच दान केलेली.

आताचे जे.एन.सी.काॅलेज व जि.प.कन्या प्रशालेची जागा यांचीच.

त्याकाळी देशमुखांना मालक हे संबोधन असायचे पण शामरावजींनी हे पूर्ण विनयाने नाकारले.कारण शामरावजी म्हणजे एक साधं,सरळ,विनम्र ,निगर्वी व मितभाषी पण स्पष्टवक्ते व्यक्तीमत्व.

शिक्षक,नगरपालिकेचे कर्मचारी,व तत्सम मध्यमवर्गीय लोकांच्या सहवासात ते कायमचे दिसून येत.

आपले मुळगाव सेलुचे ते जवळपास पंधरा वर्ष सरपंच होते.त्याच सेलू मध्ये सेवा सहकारी सोसायटी स्थापन करून त्या संस्थेच्या चेअरमन पदाची जिम्मेदारी त्यांनी कांही काळ यशस्वीपणे सांभाळली.

त्यांचे बंधू स्व नागोरावजी वैजनाथ देवस्थानचे विश्वस्त तर शामरावजी जगमित्र नागा देवस्थानचे ...

माॅडर्न एज्युकेशन च्या लिटल फ्लाॅवर चे ते सहसचिव होते.

अंबाजोगाई तालुका (तत्कालीन) पंचायत समितीचे एक टर्म ते सदस्यही होते.

स्व. बाबूरावजी आडसकर व श्री पंडितरावजी दौंड यांच्याशी मित्रत्वाची नाळ जुळलेली म्हणून काॅग्रेसचे निष्ठावंत..

नंतर नंतर कै.श्री गोपीनाथराव यांच्या बाजूने कल दिसून येत असे पण त्यांचे जेष्ठ चिरंजीव अनिलराव गोपीनाथरावजींचे कार्यकर्ते म्हणजे भा.ज.प.चे... म्हणुन. 

भेल सेकेंडरीच्या मुळे शहरात इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे मुलामुलींचा कल वाढू लागल्याचे दिसू लागल्यावर शामरावजी अस्वस्थ झाले व त्यांनी फक्त मुलींसाठी मराठी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा विचार केला.अनेकांकडे त्या संबंधाने चर्चा केलीही पण पुढे त्यांनाच शहरात केवळ मुलींसाठी उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालय (काॅलेज) सुरू करण्याची कल्पना सुचली व जी त्यांना रास्त वउचित वाटली आणि निर्धारपुर्वक पावलं उचलली.

Investment व involvement ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्या कडे होत्या.

नुसती जागा (investment) आहे पण केवळ तेव्हढ्याने कार्य तडीस जात नाही तर त्या साठी involvement ही लागते जी शामरावजी कडे होती.

त्यांची ही गुंतवणूक परळीकरांसाठी उत्कर्षाची सिध्द झाली.

आपल्या आईच्या नांवे, स्व.लक्ष्मीबाई देशमुख महिला महा विद्यालय junior College  व वरिष्ठ महाविद्यालय सुरू झाले. ते ही मुलींसाठी गावात,जवळ ,व पुर्णतः सुरक्षित अशा ठिकाणी..

अनेकांकडे कल्पना असतात ,टॅलेंट असते पण धैर्य नसते.पाठपुरावा नसतो..

A great deal of talent is lost in the world for the lack of small courage..

पण स्व. शामरावजींनी तसं होऊ दिलं नाही.हातपाय गाळून ते बसले नाहीत. एकला चलो रे.स्वतःला कमी लेखलं नाही.स्वतःला अनपढ धोतरवाला मानलं नाही.स्वतःला स्वतःच्या नजरेत कमी लेखलं नाही..

एक गझलाकार म्हणतो, "आपलं स्वतःचे म्हणता येईल असं काय असतं आपल्याकडे !"

ती असते आपली नजर. आपल्या नजरेने आपण जग बघतो,अनुभवतो.आणि तयार होतो आपला नजरिया.आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन !

हा दृष्टीकोन व्यापक असेल,निकोप असेल तर आपलं स्वतःचे व इतरांचेही आयुष्य घडवण्याचे कार्य आपल्या हातून होऊ शकते.याचे जिवंत उदाहरण म्हणजे स्व.शामरावजी देशमुख !

आपला नजरिया निकोप ठेऊन ,सृजनात्मक ठेवून शामरावजींनी जो रस्ता धरला , ज्या रस्त्यावरून वाटचाल केली तो होता...

' The road less travelled.

एक लेखक ,विचारवंत (M.Scott Peck ) म्हणतो ,

" If we decide where to go ,we will generally know how to get there.For we make a map,a real , factual map.

The map tells where we are and how far we are from the destination.

स्व. शामरावजी तशी निश्चित वाट चालत राहिले ,despite age and illness आणि..आणि आज आपण त्याची फळं चाखतो आहोत..

कांही आपल्या सारखी सामान्य माणसं ठराविक वयानंतर चालणं सोडून देतात पण स्व. शामरावजींनी तसं केलं नाही.

छोटं मोठं जे कांही ध्येय स्वतःशी निश्चित केलं होतं ते, मला वाटते , त्यांनी पुर्णांशाने पूर्ण केले आहे.

आता त्या कार्याचा आवाका वाढवणे आपले काम.तुमचं काम.ह्या वृक्षाखाली बसलेल्यांचे ते काम आहे.

काळानुसार गती तर ठेवावीच लागते अन्यथा काळ पुढे जातो.आपण आहो तिथेच राहतो.

स्व. शामरावजी काळाच्या थोडं का होईना पुढे होते.

जेंव्हा की इंग्रजी माध्यमाच्या हाय फाय शाळा  सुरू करण्याचा काळ होता, स्व.शामरावजींनी महिला वरिष्ठ महाविद्यालयाचा ध्यास घेतला.

आपल्या सुना ,लेकी उच्च विद्याविभूषित असाव्या हा विचार वास्तवात आणला...

...ऐंशीच्या दशकात शेवटी शेवटी काॅलेज सुरू झालं ..रांगू लागले .पण 1996 ला स्व.गोपीनाथराव राज्याचे उप-मुख्यमंत्री झाले आणि 1997 ला त्यांच्या मंत्री मंडळातील राज्याचे तत्कालीन उच्च शिक्षण मंत्री श्री दत्ता राणे यांनी या लक्ष्मीबाई देशमुख काॅलेजला मान्यता दिली.विद्यापिठीय संलग्नता प्राप्त झाली..

आणि आज त्या रोपट्याचा हा डेरेदार वृक्ष उभा आहे.

आमच्या जन्मोजन्मीची सावली, शिदोरी  !!

या वृक्षाच्या सावलीत आपला संसार फुलवणारे सारेच म्हणतात,

" तुमच्या सावलीत आम्हाला 

   मिळतो शितल विसावा

   विश्वास आहे आम्हा

 जन्मभर हा आधार मिळावा."

.....शामरावजी,

आम्ही ही तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो.

आम्हीही आमच्या कष्टाने याचे सिंचन करू.खतपाणि करू.कुठल्याही किमतीवर याचे संवर्धन, संरक्षण करू आणि आमच्या नंतरच्या अनेक पिढ्यांसाठी हा आधारवड बनवू !!

असंच होणार आहे हा विश्वास व्यक्त करून , आदरणीय स्व.शामरावजींना विनम्र अभिवादन करून ही शब्द सुमनांजली अर्पण करतो...

🙏🙏🙏🌸🌸🌸🙏🙏🙏


...............पी.एन.देशपांडे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !