MB NEWS-घर नसलेल्या कुटुंबाला घरकुल देण्याच्या मागणीसाठी करेवाडी ग्रामस्थांचे आमरण उपोषण पात्र लाभार्थ्यांना वगळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करा

 घर नसलेल्या कुटुंबाला घरकुल देण्याच्या मागणीसाठी करेवाडी ग्रामस्थांचे आमरण उपोषण 


पात्र लाभार्थ्यांना वगळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करा 


परळी (प्रतिनिधी)

पंचायत समितीच्या सर्व्हेक्षण कमिटीकडून अंतिम यादीत अफरातफर करण्यात आली असून पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात आले असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. असे करणाऱ्या पंचायत समितीच्या दोषी अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून पात्र लाभार्थी कुटुंबांना घरकुल देऊन न्याय द्यावा असे तालुक्यातील मौजे करेवाडी येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासाठी दि.8 नोव्हेंबर रोजी सकाळीपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे.

उपोषणास बसण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे करेवाडी ता.परळी वै जि.बीड येथील घरकुलचा सर्वे करून ज्या लोकांना गांवामध्ये पडकी घरे पत्र्याचे सेड,कच्चे घर असलेले नागरिक १. अशोक आबासाहेब घाटुळ २.जनक आबासाहेब घाटुळ ३. भिवराव विठ्ठल कावळे ४. भागवत विठ्ठळ कावळे ५. वैजनाथ भागवत कावळे ६. उमेश भागवत कावळे इत्यादी लोकांचे सर्वे करून घरकुल योजनेतुन आपल्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्याने नांव यादीतील नाव वगळले आणि दि.१६/१०/२०२१ रोजी वार शनिवार रोजी घर पाहणीसाठी आलेल्या आपल्या कार्यालयातील अधिकारी यांनी नवरदेव फिरवल्यासारखे गावातील रस्त्याने एक फेरी मारून खोटा सर्व्हे केला व पंचायत समिती कार्यालयाने घरकुल लाभार्थी निवडी संबंधीत गावकऱ्यास खोटी माहिती देवुन आम्हा गोर-गरीबांची फसवणुक व दिशाभुल केली. तरी मा.साहेबांनी आमच्या निवेदनाचा सहानुभूतीपुर्वक विचार करून संबंधीत अधिकारी यांना दि.२७/१०/२०२१ रोजी पर्यंत निलंबीत करावे अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला होता आणि दि.08 नोव्हेंबर पासून ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार