MB NEWS-नंदागौळचे भुमीपुत्र डॉ.सुनील गित्ते यांची राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण व संशोधन संस्था मुंबई येथे संचालक पदावर नियुक्ती

 नंदागौळचे भुमीपुत्र डॉ.सुनील गित्ते यांची राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण व संशोधन संस्था मुंबई येथे संचालक पदावर नियुक्ती 



नंदागौळकरांच्या वतीने

 डॉ.सुनील गित्तेचा सत्कार

 संपन्न 

परळी(प्रतींनिधी) परळी तालुक्यातील नंदागौळ येथील डॉ.सुनील विलासराव गित्ते हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नियुक्त झालेले अधिकारी असून त्यांनी यापूर्वी छतीसगड राज्यात आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक तसेच निर्माण भवन,नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य विभागात सहाय्यक महानिदेशक म्हणून प्रभावीपणे काम केलेले आहे,या कार्याची दखल घेत केंद्रशासनाने त्यांची मुंबई येथे राष्ट्रीय राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण व संशोधन संस्थेत संचालक या पदावर नुकतीच नेमणूक करण्यात आली असून,त्यांची निवड झाल्यामुळे नंदागौळसह बीड जिल्ह्याचा एक भूमीपुत्र एका महत्वाचा पदावर आल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला असून,त्यांचा सत्कार नंदागौळचे सरपंच सुंदर गित्ते यांनी ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन केला,यावेळी त्यांचे बंधु प्राध्यापक चंद्रकांत गित्ते,महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे,माजी सैनिक संभाजी गित्ते,ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ जगताप,तसेच धनराज गित्ते,व्यंकटी गित्ते,रघुनाथ गित्ते,जिटी टेलर,शामसुंदर गित्ते,रमेश गित्ते,पंडित जगताप यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार