MB NEWS- *महिला महाविद्यालयात अर्थनियोजनाबद्दल झाले व्याख्यान *

 *महिला महाविद्यालयात अर्थनियोजनाबद्दल झाले व्याख्यान *


परळी , प्रतिनिधी.

        येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्मार्ट फायनान्शिअल प्लॅनिंग बाय एस.बी.आय लाइफ' ही संकल्पना घेऊन उद्बोधक व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानामध्ये जीवनातील अर्थनियोजनाबद्दल उत्तम प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले.प्रमुख वक्ते डिव्हिजनल  मॅनेजर श्री नंदकिशोर कुलकर्णी यांनी सध्याच्या आर्थिक युगात अर्थ नियोजन हे कसे महत्त्वाचे आहे हे सांगून अर्थाचे नियोजन कसे करावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी अत्यंत समर्पक शब्दात आणि सोप्या पद्धतीने अनेक उदाहरणे देऊन फायदेशीर गुंतवणुकीचे  अनेक पर्याय सांगितले.तर डिव्हिजनल ब्रांच मॅनेजर श्री अविनाश राठोड यांनी गुंतवणुकीचे नवे पर्याय सांगताना जीवनातील विम्याचे महत्त्व विशद केले.जनरल ॲडव्हायझर श्री उमाकांत सातोनकर यांनीही बँकेच्या वतीने कार्यक्रमात महत्त्वपूर्ण उपस्थिती दर्शवली.

           सदरच्या माहितीपूर्ण व्याख्यानाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. डॉ. विनोद जगतकर यांनी केले तर आभार प्रा. डॉ. आर. एल. जोशी यांनी मानले. या कार्यक्रमास प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार