MB NEWS- शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांसाठी दोन दिवसाचे विधीमंडळाचे अधिवेशन घ्या, शरद पवार यांच्याकडे विजय गव्हाणे यांची मागणी

 शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांसाठी दोन दिवसाचे विधीमंडळाचे अधिवेशन घ्या, शरद पवार यांच्याकडे विजय गव्हाणे यांची मागणी

नाशिक, प्रतिनिधी....


महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांसाठी विधिमंडळाचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून यामध्ये सखोल आणि सकारात्मक चर्चा करावी अशी जोरदार मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचे राज्य समन्वयक तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विजय गव्हाणे यांनी आज नाशिक येथे केली.



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात केली…. परभणी जिल्ह्यातील नेते तथा माजी आमदार आणि राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे राज्य समन्वयक विजय गव्हाणे म्हणाले की महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्नांची सोडवणूक सध्या करणे गरजेचे आहे

 राजश्री शाहू महाराज आणि महात्मा फुले यांनी मुहूर्तमेढ लावलेल्या या शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्याची नितांत गरज आहे

 राज्य सरकार शिक्षणावर केवळ अडीच टक्के खर्च करीत आहे मात्र उलट दिल्लीचे सरकार जास्त खर्च करते कोठारी कमिशन च्या आधारे हे प्रश्न सुटले पाहिजेत शिक्षकांच्या अनुदानाच्या प्रश्नावरही व्यवस्थित मार्ग निघाला पाहिजे अशीही त्यांनी मागणी केली

 राज्य शिक्षण महामंडळाच्या माध्यमातून या अधिवेशनातून शरद पवार यांना विनंती आहे की तुम्ही यात लक्ष घालावे आणि महाराष्ट्रातील आमदार यांनी पुढाकार घेऊन दोन दिवसाचे विजय विशेष अधिवेशन घेण्याची नितांत आवश्यकता आहे

सखोल आणि धोरणात्मक निर्णय होण्याची गरज निर्माण झाली आहे महाराष्ट्रातील शिक्षण संस्था आणि शिक्षण व इतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आज घडीस प्रलंबित आहे या प्रश्नांची तड लावण्यासाठी शिक्षण क्षेत्रात मूलभूत क्रांती निर्माण झाली पाहिजे आणि त्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेऊन दोन दिवसांचे अधिवेशन मुंबईचा घेतले पाहिजे अशी जोरदार मागणी त्यांनी या वेळेला केली


 या अधिवेशनासाठी खासदार शरद पवार मंत्री छगन भुजबळ अध्यक्ष विजय नवल पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती नाशिक येथे हे दोन दिवसांचे अधिवेशन सुरू आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार