MB NEWS-परळी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड थांबवा - काॅंग्रेसची मागणी

 परळी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड थांबवा - काॅंग्रेसची मागणी

परळी( प्रतिनिधी)- तालुक्यातील परळी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची तपासणी करण्यासाठी हेळसांड केली जाते.ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांवर उपचार न करता इतर ठिकाणी रेफर केले जाते.ग्रामीण भागातील शेकडो रुग्ण उपचार मिळण्याच्या आशेने परळी येथील रुग्णालयात धाव घेत असतात.मात्र, तेथेही त्यांना निराशेला सामोरे जावं लागतं.कारण, शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळेल.परंतु,सर्व कर्मचारी, डॉक्टर , असूनदेखील रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही.तसेच, उपकार केल्यासारखे कर्मचारी रुग्णांशी वागतात . त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.ही होणारी हेळसांड थांबवावी यासाठी परळी शहर काँग्रेसच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.यावेळी परळी काँग्रेस शहराध्यक्ष बहादूर भाई,गणपत कोरे,माजी शहराध्यक्ष प्रकाश देशमुख,समुंदर खान पठाण, युवक अध्यक्ष धर्मराज खोसे,सय्यद आल्ताफ,शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष गुलाब देवकर, ॲड.शशीशेखर चौधरी, उपाध्यक्ष युवक काँग्रेस शेख आलीमभाई,शहर उपाध्यक्ष अशोक कांबळे,सय्यद सलीम, ओबीसी शहराध्यक्ष शेख जावेद, युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रा.नितिन हत्तिअंबिरे , देशमुख आदिंची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !