MB NEWS-माता न तू वैरीणी.............! दिड महिन्याच्या बाळाला दिले बेवारस सोडुन; बेंगलोर एक्स्प्रेस मध्ये प्रकार उघडकीस

 माता न तू वैरीणी.............!

दिड महिन्याच्या बाळाला दिले बेवारस सोडुन; बेंगलोर एक्स्प्रेस मध्ये प्रकार उघडकीस

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

    नांदेड बेंगलोर एक्सप्रेस गाडी परळी रेल्वे स्थानकावर आज दिनांक आठ रोजी सकाळी आली असताना या गाडीच्या एका डब्यात एक ते दीड महिन्याचे वय असलेले बाळ सीटवर बेवारस सोडून देण्याचा प्रकार आढळून आला आहे. याप्रकरणी परळी रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान या बाळावर अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत.

        याबाबत रेल्वे पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहिती अशी की आज दिनांक आठ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नांदेड बेंगलोर एक्सप्रेस गाडी परळी रेल्वे स्थानकावर आली असताना या गाडीच्या कोच नंबर एस २ मध्ये एकाच सीटवर सुमारे एक ते दीड महिने वयाचे एक बाळ बेवारस अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी या बाळाच्या मातेचा तपास केला असता कोणीही आढळून आले नाही. या बाळाला सांभाळायचे नसल्याने अज्ञात मातेने हे बाळ बेवारस अवस्थेत सोडून दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली असून याप्रकरणी अधिक तपास रेल्वे पोलीस करीत आहेत. दरम्यान मिळून आलेले बाळ एक ते दीड महिन्याचे असून परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर या बाळाला अंबाजोगाई येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या बाळाची प्रकृती ठीक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान या निर्दयी मातेचा शोध पोलीस घेत असून परळी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरॅंच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासात एक महिला रेल्वे फलाटावर लहान मुलगा हातात घेऊन रेल्वेकडे जात असताना फुटेज मिळून आले आहे. यावरून पोलिस पुढील तपास करत असून लवकरच या निर्दयी मातेचा शोध लागण्याची शक्यता आहे.मात्र या घटनेने  सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या आई या नात्याला काळीमा लावली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !