MB NEWS-एसटी कामगारांचे आंदोलन सुरूच ; परळीत मुंडण करुन कामगारांनी वेधले लक्ष 🕳️ प्रशासकीय कारवाई करण्यापेक्षा आम्हाला फासावर द्या - कामगारांच्या संतप्त भावना

 एसटी कामगारांचे आंदोलन सुरूच ; परळीत मुंडण करुन कामगारांनी वेधले लक्ष 

🕳️ प्रशासकीय कारवाई करण्यापेक्षा आम्हाला फासावर द्या - कामगारांच्या संतप्त भावना

परळी वैजनाथ, प्रतिनिधी :

          एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच असुन   प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज परळीत मुंडण करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न कामगारांनी केला.शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांच्या वतीने व्यक्त करण्यात आला. 

          एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन सुरू आहे. वार्षिक वेतन वाढीचा दर तीन टक्के करावा, राज्य सरकारप्रमाणे देय महागाई भत्ता अदा करावा ,राज्य सरकारप्रमाणे देय घर भाडे अदा करावे, सण उचल म्हणून बारा हजार पाचशे रुपये दिवाळीपूर्वी अदा करावी , दिवाळीपूर्वी पंधरा हजार रुपये बोनस मिळावा या मागणीसाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. आता शासनात विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.या अनुषंगाने आज परळीत मुंडण करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न कामगारांनी केला. 

                                 Video





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !