MB NEWS-एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी गुरूवारी सिआयटीयु संघटनेच्या वतीने निदर्शने

 

एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी गुरूवारी सिआयटीयु संघटनेच्या वतीने निदर्शने

परळी वै. ता.९ प्रतिनिधी

     एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी गुरूवारी (ता.११) सकाळी अकरा वाजता सीआयटीयु संघटना परळीच्या बसस्थानका समोर निदर्शने करणार असल्याची माहीती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ बी जी खाडे यांनी दिली आहे.

      एसटी महामंडळाचे शासनात समावेश करावे, एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामाउन घ्यावे या मागणीसाठी एसटी चे कर्मचारी आठवडया पासुन संपात सहभागी झाले आहेत. राज्यातील सर्वच एसटी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. या मागणी वरूण आजी माजी सत्ताधारी राजकारण करीत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ व सरकारच्या विरोधात गुरूवारी (ता.11) सकाळी अकरा वाजता बसस्थानका समोर सिआयटियु निदर्शने करणार आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय व पोलीसांना देण्यात आले आहे. या आंदोलनात सर्वच क्षेत्रातील कामगारांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन सिआयटियु चे जिल्हाध्यक्ष कॉ बी जी खाडे व कोषाध्यक्ष कॉ किरण सावजी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !