MB NEWS- *सात्विकभाव हा आदर्श जीवनप्रणालीचा पाया - ह.भ.प.बाळकृष्ण महाराज वसंतगडकर*

 *सात्विकभाव हा  आदर्श जीवनप्रणालीचा पाया - ह.भ.प.बाळकृष्ण महाराज वसंतगडकर* 

परळी वैजनाथ ।प्रतिनिधी.......

          गीता -भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे असे संतप्रमाण आहे. त्या अनुषंगाने विचार करता संतसंग जीवनाचे परिवर्तन घडवून आणणारा असतो. यासाठी अध्यात्मिक बैठक गरजेची असुन  सात्विकभाव व अध्यात्मिक संगती आदर्श जीवनाची पायाभरणी करणारी असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. बाळकृष्ण महाराज वसंतगडकर(सातारा)   यांनी केले. 

        परळी तालुक्यातील नंदनज येथील बाबुराव पंढरीनाथ आघाव व जिल्हा परिषद सदस्य प्रा.मधुकर आघाव यांच्या मातोश्री सौ.पंचफुलाबाई पंढरीनाथ आघाव यांच्या गोडजेवणाच्या कार्यक्रमानिमित्त दि. 19  नोव्हेंबर रोजी किर्तन महोत्सव झाला. दुपारी 1 ते 3 वा.  बाळकृष्ण दादा वसंतगडकर (सातारा)  यांचे किर्तन झाले. याप्रसंगी त्यांनी विविध दृष्टांत व अमोघ वाणीतून तत्त्वचिंतन मांडले.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या "स्वगत सच्चिदानंद मिळोनी, शुध्द सत्वगुणे विणली रे, षड्गुण गोंडे रत्नजडीत तुज, श्यामसुंदर शोभली रे... या अभंगाचे विवेचन त्यांनी याप्रसंगी केले. या चिंतन श्रवणात भाविक मंत्रमुग्ध होउन गेले.पुढे चिंतन मांडताना ह.भ.प. बाळकृष्ण महाराज वसंतगडकर(सातारा)  यांनी सांगितले की, भक्त, इश्वर, साधना, भक्तिमार्ग यासह ज्ञान,भक्ती व वैराग्याचे यथार्थ वर्णन आपल्या धर्मात केलेले आहे. सात्विकभाव हा साधकामध्ये रुजला पाहिजे. मातोश्री सौ.पंचफुलाबाई यांनी तो सात्विक भाव जीवनभर जपला.त्यांचे जीवन कृतार्थ झाले.प्रत्येकाने सात्विक भाव जपुन संतविचाराने चालावे असे प्रतिपादन त्यांनी केले.

             यावेळी कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर,  गुणीजन, श्रोते, भजनी मंडळी व हजारो भाविकांची  मोठी उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार