इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- *हिवाळी अधिवेशनात परळी मतदारसंघातील 13 तलाठी कार्यालये, निवासस्थाने व 7 रस्त्यांच्या विकासकामांसाठी 29.13 कोटी!* *13 सज्जाच्या ठिकाणी होणार तलाठी कार्यालये; परळी मतदारसंघातील 7 महत्वाच्या रस्त्यांचे होणार पुनरुज्जीवन - धनंजय मुंडे*

 *हिवाळी अधिवेशनात परळी मतदारसंघातील 13 तलाठी कार्यालये, निवासस्थाने व 7 रस्त्यांच्या विकासकामांसाठी 29.13 कोटी!*



*13 सज्जाच्या ठिकाणी होणार तलाठी कार्यालये; परळी मतदारसंघातील 7 महत्वाच्या रस्त्यांचे होणार पुनरुज्जीवन - धनंजय मुंडे*


मुंबई (दि. 23) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार परळी मतदारसंघातील 13 तलाठी कार्यालये व निवासस्थानांची उभारणी व 7 महत्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरण व सुधारणा कामे यासाठी हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमधून एकूण 29.13 कोटी रुपयांच्या कामांना निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.


परळी तालुक्यातील 13 तलाठी कार्यालये व निवासस्थाने त्या-त्या सज्जाच्या ठिकाणी उभारणीच्या कामांसाठी पुरवणी मागण्यांमधून एकूण 3.18 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.


त्याचबरोबर परळी व माजलगाव या दोनही मतदारसंघातील महत्वाच्या लवूळ-पात्रुड-गोवर्धन-जीवणापूर या 55 किमी रस्त्याचे रुंदीकरण, सुधारणा व लहान पुलाच्या कामासाठी 4.5 कोटी रुपये त्याचप्रमाणे  खोडवा सावरगाव-दैठणा-अंतरवेली रस्त्यासाठी 3 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.


त्याचप्रमाणे अंबाजोगाई ते मांडवा-मांडेखेल-नाथरा-सोनपेठ या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी 4 कोटी, हिंगणी-आमला-कांनापूर-बोधेगाव-सोनहीवरा या रस्त्याच्या रुंदीकरण, सुधारणा व पुलाच्या कामासाठी 6 कोटी रुपये, टोकवाडी-नागापूर-नागपिंप्री-बोधेगाव या रस्त्याच्या रुंदीकरण, सुधारणा व पुलाच्या कामासाठी मिळून 6 कोटी रुपये आणि अंबाजोगाई-गित्ता-जवळगाव या रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा कामासाठी 2.45 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.


मतदारसंघातील विकासकामांसाठी 29.13 कोटी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्य शासनाचे आभार मानले आहेत. तसेच या कामांना प्रशासकीय मान्यता मिळवून लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!