इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-*धनंजय मुंडे यांचा यशस्वी पाठपुरावा; जिल्हा जातपडताळणी समित्यांना एकाच दिवसात मिळाले 14 अधिकारी!* *महसूल विभागाने 20 अधिकाऱ्यांना दिली पदोन्नती, त्यापैकी 14 जणांची जिल्हा जातपडताळणी समित्यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती* *प्रभारी राज कमी झाल्याने जातपडताळणी प्रक्रियेचा वाढणार वेग*


*धनंजय मुंडे यांचा यशस्वी पाठपुरावा; जिल्हा जात पडताळणी समित्यांना एकाच दिवसात मिळाले 14 अधिकारी!*

*महसूल विभागाने 20 अधिकाऱ्यांना दिली पदोन्नती, त्यापैकी 14 जणांची जिल्हा जातपडताळणी समित्यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती*


*प्रभारी राज कमी झाल्याने जातपडताळणी प्रक्रियेचा वाढणार वेग*


मुंबई (दि. 23) ---- : राज्यातील जिल्हानिहाय जात पडताळणी समित्यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे महसूल विभागाने दिलेल्या पदोन्नती मधून एकाच दिवशी 14 अधिकारी (अध्यक्ष) मिळाले आहेत. 


महसूल विभागाने तात्पुरत्या पदोन्नतीची एकूण 20 अधिकाऱ्यांची यादी बुधवारी (दि.22) निर्गमित केली असून यामधून तब्बल 14 अधिकाऱ्यांना विविध जिल्ह्यातील जात पडताळणी समित्यांच्या अध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली आहे.


राज्यात एकूण 36 जातपडताळणी समित्या जिल्हा स्तरांवर कार्यरत असून, जवळपास 20 जिल्ह्यात प्रभारी राज असल्याने जातपडताळणी प्रक्रियेस काही प्रमाणात विलंब लागत होता. त्या 20 पैकी आता 14 ठिकाणी पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने जातपडताळणी प्रक्रियेचा वेगही वाढणार आहे.


दरम्यान सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकताच जातपडताळणीची संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत व ऑनलाईन करून पासपोर्टच्या धर्तीवर राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध असणे गरजेचे होते. धनंजय मुंडे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार व्यक्त केले असून, उर्वरित 7 समित्यांना देखील लवकरच पूर्णवेळ अधिकारी (अध्यक्ष) उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!