MB NEWS-सावधान! आता सोयाबीनची डोळ्यात तेल घालून करावी लागणार राखण ; उभ्या ट्रकमधून 2 लाखाचे सोयाबीन चोरले

 सावधान! आता सोयाबीनची डोळ्यात तेल घालून करावी लागणार राखण ; उभ्या ट्रकमधून 2 लाखाचे सोयाबीन चोरले 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    सोयाबीन ला सध्या चांगला भाव मिळत आहे.त्यामुळे चोरट्यांनी सोयाबीन कडे आपला मोर्चा वळवला आहे.सोयाबीन चोरीच्या घटना समोर यायला लागल्या आहेत.परळीत मध्यरात्रीच्या सुमारास उभ्या ट्रकमधून 2 लाखाचे सोयाबीन चोरले असल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे.

       परळी शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद चौकात उभ्या असलेल्या ट्रकमधून 2 लक्ष रुपयांच्या सोयाबीनची चोरी करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत ट्रक ड्रायव्हर रशीद शेख यांच्या फिर्यादीवरून परळी शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येत आहे.जयम लॉजीस्टिक कंपनीचे जवळपास 17 लक्ष रुपयांचे सोयाबीन ट्रक क्रमांक एम.एच.44- यू 1444 या ट्रकमध्ये सेनगाव येथून भरण्यात आले होते. सोलापूर येतील एका कंपनीत हा माल पोच केला जाणार होता. रात्र झाल्याने ट्रक ड्रायव्हर रशीद शेख यांनी परळीत मुक्काम करण्याचे ठरवले. सकाळी पहाटे सोलापूरकडे निघण्याच्या तयारीत असतांना त्यांना गाडीतील सोयाबीनची चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत सविस्तर फिर्याद परळी शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !