MB NEWS-सिरसाळ्यात चोरांनी मारला डल्ला;चोरी की बनाव? 47 लाख 78 हजार केले लंपास; पोलिसांत गुन्ह्याची नोंद

 सिरसाळ्यात चोरांनी मारला डल्ला;चोरी की बनाव?


47 लाख 78 हजार केले लंपास; पोलिसांत गुन्ह्याची नोंद


सिरसाळा.......सिरसाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका जिनिंग फॅक्टरीमध्ये मोठी चोरी झाल्याची बाब समोर येत आहे. याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमकार उत्तमराव खुरपे असे फिर्याद देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. जिनिंग फॅक्टरीतील तिजोरीतून तब्बल 47 लाख 78 हजार रुपये चोरीला गेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार कलम 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी ओंकार उत्तमराव खुर्पे वय 40 वर्ष व्यवसाय-पोर्णीमा काँटन जिनिंग अँन्ड प्रेसिंग फॅक्टरी रा.नवीन बसस्टॅन्टसमोर माजलगाव समक्ष पोलीस स्टेशनला हजर येउन फिर्याद देतो की मी वरील ठिकाणी परिवारासह राहतो . मी व माझे सोबत माझे मोठे भाउ धनंजय खुर्पे व पुतण्या सिद्धांत खुर्पे असे आम्ही तिघे मिळुन कौडगाव घोडा ता.परळी येथे पोर्णीमा काँटन जिनिंग अँन्ड प्रेसिंग फॅक्टरी येथे पंधरा वर्षापासुन चालवितो सदर काँटन जिनिंग फॅक्टरीमध्ये कापुस खरेदी करुन कापसापासुन सरकी वेगळी करुन रुईच्या गाठी तयार करण्याचा व्यवसाय करतो. व विक्री करतोत त्यासाठी शेतक-यांचा कापुस खरेदी केला जातो. फॅक्टरीमध्ये कर्मचा-यासाठी सहा रुमचे बांधकाम केले आहे त्यामध्ये एका रुममध्ये किचन आहे.एका रुममध्ये कार्यालय व एका रुममध्ये मुख्य तिजोरी आहे व ईतर रुम राहण्यासाठी उपयोगात येतात. आमचे जिनिगचे नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परळी या बँकेचे खाते आहे. मी बाहेरगावी असल्याने व दोन दिवस सलग बँकेला सुट्टी असल्याने कापुस खरेदीसाठी जिनिंग फॅक्टरीचे कॅशीर अशोक भिमराव साळुके व त्यांचे सोबत निलेस विलासराव देशमुख यांनी परळी येथे जाउन दि 24 डिसेंबर रोजी 50 लाख काढुन आणले होते. सदर रक्कम मधुन काही रक्कम कशीयर साळुके यांनी त्याच दिवशी शेतक-यांना वाटप केली होती व रात्रीला हिशोब करुन शिल्लक रक्कम 4778400/-पैकी 45 लाख रु मुख्य लोखंडी तिजोरीत लॉक करुन ठेवले व 278400/- रु समोरील रुमच्या लोखंडी कपाटामध्ये ठेवले होते. दि 25 डिसेंबर रोजी रात्री 03.18 वा मला ग्रेडर कारभारी कचरु हारकाळ यांनी फोनद्वारे कळविले की मी व कॅशीयर अशोक साळुके असे आम्ही रात्री जेवण करुन 12.15 वा झोपलो व 03.15 वा कँशीयर अशोक साळुके यांनी माझे रुमचा दरवाजा ठोकुन उठवले व सांगीतले की माझ्या उश्याखाली ठेवलेली लोखंडी कपाटाची चावी काढुन त्याच्या रुममधील कपाट उघडुन 278400/- रु व चेकबुक व मुख्य तिजोरीची चावी तसेच मुख्य तिजोरी मधील 45 लाख रु असे एकुन 4778400/-रु कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेले आहे असे सांगीतले. त्यानंतर मी बाहेर गावी असल्याने मी लागलीच माझा पुतण्या राहुल खुर्पे ,सिद्धांत खुर्पे यांना फोन करुन ताबडतोब जिनिंग फॅक्टरीवर माजलगाव येथुन जाण्यास सांगीतले व पोलीसांना माहीती दिली त्यानंतर मी बाहेर गावावरुन जिनिंग फॅक्टरीवर पोहचलो मुख्य तिजोरीची चावी सुद्धा चोरटयांनी चोरुन नेल्याने मुख्य तिजोरी लॉक असल्याने ड्रील मशीनच्या व कटरच्या सहाय्याने उघडुन बघितले असता त्यामध्ये ठेवलेले पैसे नसल्याची खात्री करुन घेउन आज रोजी पोलीस स्टेशनला येउन फिर्याद देत आहे. वरील फिर्यादीवरून सिरसाळा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप एकसिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !