MB NEWS-*लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त वैद्यनाथ कॉलेजमध्ये वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन*

*लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त वैद्यनाथ कॉलेजमध्ये वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन*
 परळी - जवाहर शिक्षण संस्था संचालित वैद्यनाथ कॉलेजमध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी सकाळी दहा वाजता महाविद्यालयाचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे सभागृहा मध्ये होणार आहे.
     स्पर्धेत राज्य  स्तरावरील विविध महाविद्यालयातील इयत्ता अकरावी ते पदवीपर्यंतचे वाक्पटु सहभागी होणार आहेत. या  स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या संघास सांघिक पारितोषिक तसेच वैयक्तिक पारितोषिके,  प्रथम रुपये 7000/-, द्वितीय रुपये 5000/-, तृतीय रुपये 3000/-आणि रुपये 1000 चे तीन  उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धेचा विषय 'ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे शैक्षणिक उद्दिष्टे साधली जातात /नाहीत' असा आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री एम. एस. मुंडे, पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ व ॲड.हरिभाऊ गुट्टे,  ज्येष्ठ विधिज्ञ,परळी वैजनाथ. उपस्थित राहणार आहेत.
       या आयोजित वाद-विवाद स्पर्धेच्या 11व्या पुष्पा करिता राज्यांमधील सर्व विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील प्रत्येकी दोन  वाक्पटु यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे वैद्यनाथ कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. मेश्राम व संयोजक डॉ. एम. जी. लांडगे सहसंयोजक प्रा. डॉ. प्रकाश कोपार्डे प्रा.डॉ. रामेश्वर चाटे,  प्रा. वाय. डी .रेड्डी, प्रा. दिलीप गायकवाड यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार