इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-बीडच्या रेल्वेसाठी राज्य शासनाचे आणखी 90.13 कोटी* *राज्य शासनाकडून एकूण 1413 कोटी रुपये मंजूर* *बीड जिल्हा वासीयांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध - धनंजय मुंडे*

 *बीडच्या रेल्वेसाठी राज्य शासनाचे आणखी 90.13 कोटी*


*राज्य शासनाकडून एकूण 1413 कोटी रुपये मंजूर* 



*बीड जिल्हा वासीयांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध - धनंजय मुंडे*


मुंबई (दि. 23)  : ---- अहमदनगर बीड परळी या बहु प्रतीक्षित रेल्वे मार्गाकरिता 2826 कोटी एवढा

खर्च अंदाजित असून उक्त खर्चा पैकी एकूण 1413 कोटी असा 50% टक्के हिस्सा राज्य शासनाकडून रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या शासन निर्णय क्रमांक 1021/133 अंतर्गत आणखी 90.13 कोटी रुपये बीड रेल्वे साठी मंजूर करण्यात आले आहेत.


बीड जिल्हा वासीयांचे रेल्वेचे पूर्ण स्वप्न करण्याची 50% जबाबदारी ही राज्य सरकारची असून यासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला जाईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आज मंजूर झालेल्या 90 कोटींसह भविष्यातही ठरलेल्या समिकरणाप्रमाणे वेळोवेळी निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.


बीडचे तीन पिढ्याचे स्वप्न म्हणून रेल्वे प्रश्न रखडलेला आहे. सदरील रेल्वे प्रकल्पा करिता केंद्र शासनाने दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत 1557 कोटी इतका खर्च केला असून 2021-22 साठी 249 कोटी इतकी तरतूद केली असल्याचे मध्य रेल्वेने कळवले आहे. 


राज्य शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत एकूण 1322.87 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे. प्रकल्पाच्या खर्चात हिश्याचे समप्रमाण राखण्यासाठी सन सन 2021-22 करिता रेल्वेने केलेल्या मागणीच्या रक्कमे पैकी 90.13 कोटी  निधी राज्य सरकारने मंजूर करून वितरित करण्यास परवानगी दिली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थ व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या