MB NEWS-खा. शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस परळीत साध्या पद्धतीने व सामाजिक उपक्रमांद्वारे होणार साजरा*

 खा. शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस परळीत साध्या पद्धतीने व सामाजिक उपक्रमांद्वारे होणार साजरा*




*200 विधवा महिलांना पिठाच्या गिरणीचे वाटप तर खा. पवार साहेबांचे 20 हजार चौरस फुटांचे तैलचित्र साकारणार*



*खा. शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस परळीत साध्या पद्धतीने व सामाजिक उपक्रमांद्वारे होणार साजरा*


*200 विधवा महिलांना पिठाच्या गिरणीचे वाटप तर खा. पवार साहेबांचे 20 हजार चौरस फुटांचे तैलचित्र साकारणार*


परळी (दि. 10) ---- : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित  शरदोत्सव हा कार्यक्रम तिन्ही सेनादलांचे प्रमुख जनरल विपीन रावत व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.


तीनही दलाचे प्रमुख व सैन्य दलातील अधिकाऱ्यांचा अपघाती मृत्यू ही देशाची मोठी हानी झाली असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले होते.


याच पार्श्वभूमीवर खा. शरदचंद्रजी पवार साहेबांचा 12 डिसेंबर रोजी साजरा होणारा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याच्या सूचना ना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.


ना. धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार व नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 11 व 12 डिसेंबर असे दोन दिवस विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार असून, राष्ट्रवादी सेवा सप्ताहात नाव नोंदणी केलेल्या 200 विधवा महिलांना पिठाच्या गिरणीचे वाटप ना. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार (दि. 11) रोजी सकाळी 11 वा. ना. मुंडेंच्या जगमित्र संपर्क कार्यालयासमोरील प्रांगणात होणार आहे.


सुप्रसिद्ध कलाकार मंगेश निपाणीकर यांनी खास तयार केलेल्या खा. पवार साहेबांच्या 20 हजार चौरस फूट तैलचित्र यानिमित्ताने परळी येथील तहसील कार्यालयासमोरील मैदानात पाहायला मिळणार असून या तैलचित्राचे ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते शनिवारी दुपारी 1 वा. विमोचन करण्यात येणार आहे. 


तर 12 डिसेंम्बर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभरात आयोजित केलेल्या व्हर्च्युअल रॅलीचे स्व. गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सर्व उपक्रमांना कोविड विषयक नियमांचे पालन करून उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ व शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार