MB NEWS-एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाबाबत ठाम निर्धार

एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाबाबत ठाम निर्धार



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

          महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवार पर्यंत कामावर रुजू व्हावे असा इशारा शासनाकडून देण्यात आला होता. मात्र या इशाऱ्याला न जुमानता अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. आज सोमवारी या आंदोलनाचा 38 वा दिवस असून जोपर्यंत राज्य शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत एकही कर्मचारी कामावर येणार नाही असा कर्मचाऱ्यांचा निर्धार आहे.

          परळी वैजनाथ येथील एसटीचे कर्मचारी गेल्या 38 दिवसांपासून संपावर आहेत. काही दिवसांपूर्वी एका कर्मचाऱ्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या त्या कर्मचाऱ्यावर अंबाजोगाई येथील स्वराती शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. परिवहन मंत्री ना.अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दोन दिवसांपूर्वी दिला होता. मात्र यालाही न जुमानता कर्मचारी संपावर ठाम आहेत.

        राज्यभरात हे आंदोलन सुरू झाल्यापासून आजपर्यंत 52 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. विलिनीकरण केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा ठाम निर्धार या कर्मचाऱ्यांचा आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून एसटीच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय जाहीर करावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार