MB NEWS-अभिव्यक्ती स्वातंत्र्याइतकेच कर्तव्य महत्त्वाचे - पो.उपाधिक्षक जायभाये विद्यार्थ्यांनो पुस्तकाशी मैत्री करा- ॲड. हरिभाऊ गुट्टे

 अभिव्यक्ती स्वातंत्र्याइतकेच कर्तव्य महत्त्वाचे - पो.उपाधिक्षक जायभाये



 विद्यार्थ्यांनो पुस्तकाशी मैत्री करा- ॲड. हरिभाऊ गुट्टे 


परळी- जवाहर एज्युकेशन सोसायटी संचलित वैद्यनाथ कॉलेज मध्ये लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे यांच्या ७२ व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा दिनांक 11 डिसेंबर रोजी संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.व्ही.मेश्राम उपस्थित होते. सकाळच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री जायभाये- डीवाय.एस.पी, श्री एम.एस.मुंडे - पोलीस निरीक्षक हे उपस्थित होते. श्री जायभाये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबरोबरच आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध स्पर्धेमध्ये यशस्वीरित्या सहभाग घेऊन स्वतःची उन्नती साधली पाहिजे. वादविवाद स्पर्धेत आपल्या सादरीकरणात अभिव्यक्ति स्वातंत्र्याइतकेच आपल्या कर्तव्यास महत्त्व देणे गरजेचे आहेत.

      दुपारच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख ॲड.हरिभाऊ गुट्टे - ज्येष्ठ विधिज्ञ मंचावरून मार्गदर्शन करताना म्हणाले की, वाक्पटू होण्यासाठी स्पर्धकाने विविध गुण अंगी बाळगून स्पर्धेची तयारी करत असताना विषय ज्ञान, सामाजिक भान निर्माण करण्याची क्षमता, भाषाशैली, वाद कौशल्य, सादरीकरण, वेळेचे नियोजन इत्यादी कडे विशेष करून लक्ष दिले पाहिजे तसेच या सर्व गुणां मध्ये पारंगत होण्यासाठी केवळ आणि केवळच प्रत्येक विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे अत्यंत आवश्यक आहे, म्हणजेच आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच वस्त्रे यत्ने करू.

      या वाद विवाद स्पर्धेत सांघिक पारितोषिक बलभीम कॉलेज बीड यांना मिळाले तर वैयक्तिक पारितोषिक प्रथम कु.साबने श्रावणी शिवाजी कै.महिला कॉलेज परळी, द्वितीय पारितोषिक विभागुन चव्हाण रोहन नामदेव बलभीम कॉलेज बीड आणि लटपटे मंदार गोविंद महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय कोद्री, तृतीय पारितोषिक कु.मोरे प्रतिक्षा बळीराम राजर्षी शाहू कॉलेज लातूर आणि तीन उत्तेजनार्थ पारितोषिके अनुक्रमे

जाधव ओमहरी कल्याण बलभीम कॉलेज बीड, कु.मुंडे रागिनी गंगाराम वैद्यनाथ कॉलेज परळी, कु.रोकडे पूजा शितलदास शिवाजी कॉलेज रेनापुर. ॲड.शिवकुमार गिरवलकर, सिद्धेश्वर इंगोले, प्रा.माणिकराव देशमुख यांनी स्पर्धेच्या परिक्षणाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सुत्रसंचलन प्राध्यापिका अर्चना चव्हाण यांनी केले तर, आभार संयोजक प्रा.डॉ.एम.जी.लांडगे यांनी मानले. स्पर्धा यशस्वितेसाठी डॉ.प्रकाश कोपार्डे, डॉ.रामेश्वर चाटे, वाय.डी.रेड्डी, दिलीप गायकवाड ई. परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !