इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS- *कै.ल.दे .महिला महाविद्यालयात लोकनेते गोपीनाथराव मुंडे जयंती साजरी*

 *कै.ल.दे .महिला महाविद्यालयात लोकनेते गोपीनाथराव मुंडे जयंती  साजरी*

   परळी , (प्रतिनिधी )

येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ' लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेला संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून व  अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्यांनी लोकनेते मुंडे साहेबांच्या सर्व सामान्यापासून सुरु झालेला प्रवास लोकनेते पदापर्यंत कसा पोहोचला . यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी प्राचार्य डॉ . एल . एस . मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन. एस .एस. कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ .पी व्ही गुट्टे ;सहकार्यक्रमाधिकारी प्रा. आर.एल .जोशी , कनिष्ठ महाविद्यालयातील एन. एस .एस .कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रवीण फुटके प्रा . डॉ. व्ही . जी जगतकर , प्रा . कोकाट सिद्धेश्वर , श्री अनिल पत्की यांनी विशेष परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  प्रा .पी .व्ही . गुट्टे  यांनी केले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या