MB NEWS- *महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित श्री.संत संताजी जगनाडे महाराज पालखी रथयात्रेचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत*

 *महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित श्री.संत संताजी जगनाडे महाराज पालखी रथयात्रेचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत*

 परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

       महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी रथयात्रेचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले आहे. या यात्रेची बीड जिल्ह्यातील सुरुवात परळी पासुन  झाली.परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले.


       महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभे तर्फे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनापासून ८ डिसेंबर २०२१ ते १४ जानेवारी २०२२ दरम्यान श्री क्षेत्र सुदुंबरे येथून खासदार रामदास तडस, अशोक व्यवहारे, डाॅ.कर्डिले,श्री गजनान शेलार यांच्या उपस्थितीत श्री संत संताजी जगनाडे महाराज रथयात्रेची सुरुवात झाली असून ही रथ यात्रा आज शुक्रवारी (दि.१७) परळीत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पदाधिकारी यांनी स्वागत केले.  या रथयात्रेतील संताजी जगनाडे महाराज यांनी लिहिलेली तुकाराम महाराजांची हस्तलिखित गाथा, जगनाडे महाराजांच्या पादुका यांचे दर्शन पदाधिकारी यांनी घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक अनिल आष्टेकर, नितीन रोडे,रवी मुळे,राहुल ताटे, सुरेश नानावटे, ऍड.सुरेश शिरसाठ, प्रा.शाम दासुद, बालाजी वाघ, अमित केंद्रे, प्रदीप जाधव,लक्ष्मण ताटे,लहू हालगे आदींसह पदाधिकारी  उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !