MB NEWS-*मांडवा येथील श्री. काळभैरव मंदिर यात्रोत्सव व कलशारोहण सोहळ्यात सौ.राजश्री धनंजय मुंडे यांनी लावली उपस्थिती* • 🕳️ *काळभैरवाचे मनोभावे दर्शन व ह.भ.प.बाळु महाराज गिरगावकर यांच्या किर्तनाचे श्रवण*

 *मांडवा येथील श्री. काळभैरव मंदिर यात्रोत्सव व कलशारोहण सोहळ्यात सौ.राजश्री धनंजय मुंडे यांनी लावली उपस्थिती*

🕳️  *काळभैरवाचे मनोभावे दर्शन व ह.भ.प. बाळु  महाराज गिरगावकर यांच्या किर्तनाचे श्रवण* 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     तालुक्यातील मांडवा येथील श्री. काळभैरव मंदिर यात्रोत्सव व कलशारोहण सोहळ्यात सौ.राजश्री धनंजय मुंडे यांनी (दि.१९) रोजी सायंकाळी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी काळभैरवाचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच  ह.भ.प.बाळु  महाराज गिरगावकर यांच्या किर्तनाचे श्रवण केले. कलशारोहणासाठी एक लक्ष रुपये रोख देणगी प्रदान केली.तसेच ना.धनंजय मुंडे यांच्या वतीने भक्तनिवास बांधकामासाठी १५ लक्ष रुपये निधी देण्याची घोषणा त्यांनी केली.

     मांडवा ता.परळी येथील ग्रामदैवत श्री काळभैरव देवस्थान समितीच्या वतीने आयोजित श्री रामकथा व ज्ञानयज्ञ सोहळा सप्ताहाचा समारोप दि.१९ रोजी हजारो भाविक भक्तांच्या साक्षीने मोठया थाटात आणि उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी सौ.राजश्री धनंजय मुंडे यांनी श्री. काळभैरवाचे मनोभावे दर्शन घेऊन ह.भ.प.बाळु महाराज गिरगावकर यांच्या सुश्राव्य किर्तनाचा लाभ घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की,ना.धनंजय मुंडे परळी मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत. त्यांच्या माध्यमातून काळभैरव मंदिर भक्तनिवास बांधकामासाठी  १५ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली.याप्रसंगी सौ.राजश्री धनंजय मुंडे यांचा मांडवा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार