MB NEWS-⬛ *बार्टीची अधिछात्रवृत्ती: राज्यातील संशोधक विद्यार्थ्यांचे परळीत उपोषण* 🌑 _सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली भेट_

 ⬛ *बार्टीची अधिछात्रवृत्ती: राज्यातील संशोधक विद्यार्थ्यांचे  परळीत उपोषण*  

🌑 _सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली भेट_

परळी (प्रतिनिधी) : बार्टीतर्फे देण्यात येत असलेली अधिछात्रवृत्ती- २०१८ एमफिल ते पीएचडी पाच वर्षांसाठी नियमित करण्यात यावी, या मागणीकरिता संपूर्ण राज्यातील विविध विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी  परळीत शुक्रवारपासून साखळी उपोषण करत आहेत. 

        विद्यापीठ अनुदान आयोग भारत सरकारच्या नियमाप्रमाणे एम.फिल. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना सलग पाच वर्षे पीएच. डी. पर्यंत फेलोशिप देण्यात येते. परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) च्या माध्यमातुन देण्यात येणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती  मात्र एम.फिल. या अभ्यासक्रमासाठी दोनच वर्षे दिली जात आहे. पीएच.डी. पर्यंत सलग अधिछात्रवृत्ती देण्यात येत नसल्याने संशोधक विद्यार्थ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागेल. यामुळे अनुसूचित जातीच्या संशोधन अधिछात्रवृत्ती  धारक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. यासाठी हे विद्यार्थी परळी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून साखळी उपोषण करत आहेत. मागणी पूर्ण होईपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहील, असा निर्धार आंदोलक विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.आंदोलक विद्यार्थ्यांनी मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यास दिले आहे. या आंदोलनात नारायण खरात, अक्षय जाधव, अमोल घुगे, भागवत चोपडे, भिमराव वाघमारे, संदीप तुपसमुद्रे, श्रद्धा सिरसाट, दीक्षा ढगे, सारिका दळवी, प्रीतम मोरे,अनिता शिंदे, उषा इंगळे, सविता गंगावणे, अमोल शिंदे, प्रमिता भोजने,यांच्यासह अनेक संशोधक  विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

         दरम्यान आज (दि.२६ ) रोजी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.तसेच या आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत त्यांनी जाणुन घेतले.मात्र त्यानंतरही आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या संशोधक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

  1. सामजिक न्याय मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा ही विनंती 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. सामाजिक न्याय मंत्री यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा. आधीच उपेक्षित वंचित समूहावर अजून अन्याय करू नये. आम्हाला आमचा शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवू नये. अनेक विद्यार्थी फेलोशीप क्या आधारावर परदेशात जाऊन शिक्षण घेत असतात. आम्हाला किमान भारतात तरी चांगले शिक्षण घेऊ द्यावे. युजीसीच्या नियमानुसार आम्हाला फेलोशीप देण्यात यावी.

    उत्तर द्याहटवा
  3. एकीकडे सरकार म्हणते शिक्षणा पासून एकही विद्यार्थी वंचित राहीला नाही पाहीजे. दुसरीकडे विद्यार्थ्यावर अन्याय केला जातो . 2018 चे विद्यार्थी जो पर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरुच ठेवणार. आणि एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेला तर सरकार जबाबदार राहील हे महाआघाडी सरकारने लक्षात ठेवाव. जाणीवपूर्वक अनुसुचित जातीच्या विद्यार्थावर अन्याय करत आहात. त्यामूळे आतापर्यत आम्ही आश्वासनावर विश्वास ठेवला परंतु आता आम्ही जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यत आम्ही आंदोलन उपोषण सुरुच राहील

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !