MB NEWS- *कु.प्रिती गोपाळराव रांजणकर यांना स्वारातीम वि.चे एम.ए. इंग्रजीत सुवर्ण पदक*

 *कु.प्रिती गोपाळराव रांजणकर यांना स्वारातीम वि.चे एम.ए. इंग्रजीत सुवर्ण पदक*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत महाविद्यालयीन पदव्युत्तर शिक्षणाचा निकाल जाहीर झाला असून दयानंद महाविद्यालय लातूरच्या विद्यार्थीनी कु.प्रिती गोपाळराव रांजणकर यांनी एम.ए.इंग्रजी विषयात सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. प्रीती रांजणकर या परळी शहर व सिरसाळा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळराव रांजणकर यांच्या कन्या आहेत.


भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळराव रांजणकर यांच्या कन्या कु.प्रिती गोपाळराव रांजणकर या दयानंद महाविद्यालय लातूर येथे कला शाखेतील एम.ए.विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत होत्या.सदरील कला शाखेच्या परिक्षेचा निकाल दि.७ डिसेंबर २०२१ रोजी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड ने जाहीर केला असून या निकालात कु.प्रिती गोपाळराव रांजणकर यांनी कला शाखेच्या एम.ए.पदवी परिक्षेत ८७.८२ टक्के गुण प्राप्त केले आहेत.विशेष बाब म्हणजे त्यांना एम.ए.इंग्रजी या विषयात स्वारातीम विद्यापीठातून सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे.त्यांनी संपादन केलेल्या या यशाचे कौतुक होत असून विविध स्तरातून अभिनंदन ही होत आहे. कु.प्रिती गोपाळराव रांजणकर यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !