MB NEWS-परळी : राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष राजकुमार डाके व परिवाराचे धनंजय मुंडेंकडून सांत्वन* *गंगासागर नगर येथील रामदत्त गिरी महाराज यांच्या जळालेल्या घराला पुन्हा उभरण्यासाठी धनंजय मुंडेंनी दिली एक लाख रुपयांची मदत; नगर परिषदेकडून घरकुलही मिळणार*

 *परळी : राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष राजकुमार डाके व परिवाराचे धनंजय मुंडेंकडून सांत्वन*


*गंगासागर नगर येथील रामदत्त गिरी महाराज यांच्या जळालेल्या घराला पुन्हा उभरण्यासाठी धनंजय मुंडेंनी दिली एक लाख रुपयांची मदत; नगर परिषदेकडून घरकुलही मिळणार*


परळी (दि. 10) ---- : परळी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष राजकुमार डाके यांच्या मातोश्री स्व. सरस्वतीबाई डाके यांचे नुकतेच निधन झाले होते, आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राजकुमार डाके व त्यांच्या परिवाराची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले. 



परळी शहरातील गंगासागर नगर भगत राहणारे रामदत्त गिरी महाराज यांच्या घरास अचानक आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. ना. धनंजय मुंडे यांनी गिरी महाराजांच्या घरी भेट देऊन त्यांना दिलासा दिला तसेच त्यांच्या घराची पुन्हा उभारणी करण्यासाठी त्यांना एक लाख रुपयांची रोख मदत दिली. त्याचबरोबर नगर परिषदेच्या वतीने त्यांना तात्काळ घरकुल मंजूर करून देण्यात यावे असे निर्देशही धनंजय मुंडे यांनी नगर परिषद प्रशासनाला दिले आहेत.


यावेळी ना. मुंडे यांच्यासह न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, उपनगराध्यक्ष शकीलभाई कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ,  जि. प. सदस्य प्रा. मधुकर आघाव, नितीन मामा कुलकर्णी, वैजनाथराव सोळंके, रवी परदेशी, अनंत इंगळे, रवी मुळे, शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, नगरसेवक तथा सभापती गोपाळकृष्ण आंधळे, रमेश भोईटे, बळीराम नागरगोजे, सुरेश नानवटे, श्रीमती कमलबाई नाईकवाडे, मुकुंद देशमुख, मोहन राजमाने, सचिन आरसुडे, मोहन राजमाने, गणेश खाडे यांसह आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार