MB NEWS- *लावण्य पब्लिक स्कूलने मुलांच्या सुप्तगुणांना वाव द्यावा- संपादक अनंत कुलकर्णी *लावण्य पब्लिक स्कूल मध्ये ‘ख्रिसमस डे’ उत्साहात साजरा*

 *लावण्य पब्लिक स्कूलने मुलांच्या सुप्तगुणांना वाव द्यावा- संपादक अनंत  कुलकर्णी



---------------------------

परळी वैजनाथ, (प्रतिनिधी):- लावण्य पब्लिक स्कूलच्या वतीने नेहमी विविध सण, उत्सव साजरे करण्याची परंपरा कायम राखली असून लावण्य शाळेने असे उपक्रम राबवावे व मुलांच्या सुप्तगुणांना वाव द्यावा असे प्रतिपादन सा.परळी संचारचे संपादक अनंत कुलकर्णी यांनी केले.

शहरातील लावण्य पब्लिक स्कूलच्या वतीने ‘ख्रिसमस डे’ निमित्त सकाळी कार्यक्रमाचे करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात अनंत कुलकर्णी बोलत होते. यावेळी लावण्य पब्लिक स्कूलचे प्राचार्या अस्मिता गोरे, जाधव सर यांच्यासह कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

पुढे बोलताना अनंत कुलकर्णी म्हणाले, कोरोनाच्या संकटानंतर दीड वर्षानंतर शासनाने निर्बंध हटवून शाळा सुरू केल्या आहेत. यामुळे चिमुकल्यांवर चेहर्‍यावर आनंद व्यक्त आहेत. शाळेच्या माध्यमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावेत असे सांगून शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले.

दरम्यान, शाळेत ख्रिसमस डे उत्साहात  साजरा  करण्यात  आला. यानिमित्त चिमुकल्यांनी नुत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शाळेच्या हॉलमध्ये यानिमित्त रंगीबेरंगी लाईटची सजावट करण्यात आली होती. हा कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी शाळेचे  कार्यवाहक गिरवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्या अस्मिता गोरे, पूजा बिडवे, माधुरी सोळंके, शारदा लोकरे आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !