इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-⬛ *परळीतून निर्माण झाला क्रिकेटच्या भारतीय अ संघासाठी खेळाडू !* 🕳️ _परळीच्या अभिषेक पवारची इंडो-नेपाळ टी २० क्रिकेट चॅम्पियनशिपसाठी निवड ; पंकजा मुंडे यांनी केले कौतुक_🕳️

 ⬛ *परळीतून निर्माण झाला क्रिकेटच्या भारतीय अ संघासाठी खेळाडू !*

🕳️ _परळीच्या अभिषेक पवारची इंडो-नेपाळ टी २० क्रिकेट चॅम्पियनशिपसाठी निवड ; पंकजा मुंडे यांनी केले कौतुक_🕳️

परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

     तालुक्यातील दारावती तांडा येथील रहिवासी असलेल्या अभिषेक विजय पवार याची इंडो नेपाल टी20 क्रिकेट चॅम्पियनशिप साठी निवड झाली आहे. परळी तालुक्यातून क्रिकेट साठी अ दर्जाचा खेळाडू मिळाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. भाजपाच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी या निवडीबद्दल अभिषेक पवारचे सत्कार करुन कौतुक केले आहे.

   


 18 ते 20 जानेवारी दरम्यान नेपाळ येथे इंडो नेपाळ टी 20 चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे. या क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय अ संघात परळीच्या अभिषेक पवार यांची नुकतीच निवड झाली आहे. अभिषेक हा न्यू हायस्कूल परळी चा विद्यार्थी आहे.यापूर्वी त्याने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या स्तरावर राज्यस्तरीय चॅम्पियनशीप मिळवली होती. त्यानंतर त्याने हा यशाचा टप्पा गाठला आहे. आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात त्याने प्रशिक्षक सतीश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासून त्याने क्रिकेटला सुरुवात केली. भारतीय संघात निवड होणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याच्या वायोगटा प्रमाणे बीड जिल्ह्यातील तो पहिला खेळाडू ठरला आहे. परळी तालुक्यातील दारावती तांडा येथील रहिवासी असलेला अभिषेक हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. वडील विजयकुमार पवार हे शेती करतात तर आई उषा या गृहिणी आहेत. सर्व सामान्य घरातून येऊन क्रिकेट सारख्या नावाजलेल्या क्षेत्रात आपल्या क्रीडा नैपुण्याने त्याने हे अव्वल दर्जाचे यश मिळवले आहे.

     अभिषेकचे लहानपणापासूनच क्रिकेट बद्दलचे आकर्षण पाहून व त्याच्यातील उमदा खेळाडू लक्षात घेऊन त्याला क्रिकेटचे चांगले प्रशिक्षण मिळावे यासाठी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी प्रोत्साहन व वेळोवेळी वडील विजयकुमार पवार यांना आर्थिक सहकार्य केलेले आहे. त्याच बरोबर बालासाहेब (पप्पू) चव्हाण यांनीही त्यास क्रिकेट प्रशिक्षणासाठी वेळोवेळी प्रोत्साहित केले आहे. त्याच्या या अतुलनीय यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. भाजपा राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी अभिषेकचे विशेष कौतुक केले आहे. पंकजा मुंडे यांच्या हस्ते अभिषेकचा या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. त्याच्या या यशाबद्दल बंजारा समाज व मित्र मंडळ यांच्या वतीने अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या