MB NEWS- *मोहा येथे एसएफआयचा वर्धापन दिन सोहळा*

 *मोहा येथे एसएफआयचा वर्धापन दिन सोहळा*




परळी वै:दि 31 प्रतिनिधी

महाराष्ट्र विद्यालय मोहा येथील मा. खासदार कॉ.गंगाधर आप्पा बुरांडे सांस्कृतिक सभागृह येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) ५२ वा वर्धापन दिन बीड जिल्हा कमिटीच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संघटनेच्या झेंड्याचे ध्वजारोहण करून शहीद भगतसिंग व माजी खासदार कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून क्रांतिकारीअभिवादन करण्यात आले. सोहळ्यास उद्घाटक म्हणून स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे मा. राज्याध्यक्ष तथा डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा किसान सभेचे नेते एड.अजय बुरांडे हे होते.


 आपल्या उदघाटनपर भाषणात एड.अजय बुरांडे यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन करत सद्या परिस्थितला धरून विद्यार्थी चळवळीचे महत्व पटवून दिले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (एसएफआय) राज्यध्यक्ष बालाजी कलेटवाड,  राज्यसचिव रोहिदास जाधव यांनी मौल्यवान असे मार्गदर्शन करत विद्यार्थी संघटनेचा दैदिप्यमान इतिहास संघटनेचे महत्व व विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली विद्यार्थी संघटनेची सोप्या भाषेत विषद करून सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुहास झोडगे हे होते त्यांनी जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांसमोर आगामी काळातील संघटने समोरील आव्हाने या संबंधी काही सूचना केल्या. तर सोहळ्याचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव लहू खारगे यांनी केले. यावेळी विद्यार्थी कार्यकर्त्यांनी विविध क्रांतिकारी गीते सादर करून सोहळा उत्साही केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक युनिटच्या सर्व कार्यकर्त्यांनी व माजी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार