MB NEWS-लसीकरणाचे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कडक कारवाई करा : चंदुलाल बियाणी आरोग्य मित्र - महाराष्ट्राचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन

 लसीकरणाचे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कडक कारवाई करा : चंदुलाल बियाणी



आरोग्य मित्र - महाराष्ट्राचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन 


औरंगाबाद : देशात आणि महाराष्ट्रात ओमायक्रोनने चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात ओमायक्रोनचे शेकडो बाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्य सरकार सतर्क झाले असून लसीकरणाचा वेगही वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण लसीकरणाच्या या मोहिमेला राज्यात काही ठिकाणी हरताळ फासला जात आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लसीकरण प्रमाणपत्राचा चक्क गोरखधंदा सुरु आहे. या संतापजनक प्रकाराचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आरोग्य मित्र - महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंदुलाल िबयाणी यांनी निवेदनाद्वारे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. 

औरंगाबादमध्ये लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हाप्रशासनाने अनेक निमय लागू केले आहेत. लस नाही तर रेशन नाही, पेट्रोल नाही, दारू नाही अगदी दुकानातही प्रवेश नाही, असे नियम लागू करण्यात आले. पण या नियमांना फायदा होण्याऐवजी गैरफायदा घेतला जात असल्याचे समोर आले आहे. लस न घेता लसीकरणाचे प्रमाणपत्र विकले जात आहे. काही पैसे देऊन हे प्रमाणपत्र दिले जात आहे. औरंगाबादच्या रोशनगेट भागात पल्स नावाच्या  एका छोट्या क्लीनिकमध्ये हा सगळा गोरखधंदा सुरु होता. अशाच प्रकारे राज्यात सर्वत्र सर्रास बोगस प्रमाणपत्र देण्याचे कारखाने सुरू आहेत. 

लसीकरण करणे हे कोविड पासून वाचण्यासाठीचे मोठे साधन आहे. मात्र त्याचाच असा गैरवापर सुरु राहिला तर खरेच कोरोना हद्दपार होईल का हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे संबंधीत विभागाने अशा गैरप्रकार करणाऱ्या अड्‌डयांचे स्टिंग ऑपरेशन करून संबंधीतावर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर आरोग्य मित्र - महाराष्ट्रचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. प्रभू गाेरे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मंजुताई दर्डा, महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. पापालाल बोरा, महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष डॉ.शिवकांत अणदूरे, विभागीय कोषाध्यक्ष राधेश्याम झंवर, मुंबई विभाग अध्यक्ष प्रशांत गोडसे, पुणे विभाग अध्यक्ष सोमनाथ लहाणे,  बीड जिल्हाध्यक्ष संतोषकुमार जेथलिया, लातूर जिल्हाध्यक्ष योगेश शर्मा, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मनोज पाटणी, जालना जिल्हाध्यक्ष दिपक शेळके, परभणी जिल्हाध्यक्ष मोहन धारासुरकर आिदंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार