MB NEWS- *महापुरुषांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही;परळीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कर्नाटकातील घटनेचा निषेध !* 🕳️ *छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास केला दुग्धाभिषेक*

 *महापुरुषांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही;परळीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कर्नाटकातील घटनेचा निषेध !*

🕳️   *छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास केला दुग्धाभिषेक*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आली होती. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून राज्यभरामध्ये ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात येत आहे.परळीतही आज सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला.



         राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या आदेशावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी परळीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिषेक केला सकाळच्या सुमारास परळी नगर परिषदेच्या अग्निशमन वाहनांनी पाणी मारून पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली संपूर्ण पुतळ्या भोवती भगव्या ध्वजांची उभारणी करण्यात आली होती. अभिषेकाच्या सुरुवातीस पुतळ्याच्या समोरील भगवी पताका फडकवण्यात आली. छत्रपती शिवराय आमचा स्वाभिमान आणि अभिमान आहेत. कर्नाटकात पुतळ्याची विटंबना करण्यात आली ही निषेधाची गोष्ट आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे संयमी कार्यकर्ते आहोत म्हणून दुग्धाभिषेक करत आहोत, परंतु अशा घटना भविष्यात घडल्या तर त्या आम्ही खपवून घेणार नाहीत. मतांचा जोगवा मागणाऱ्या भाजपचे लोक फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा फक्त वापर करतात. एवढेच महाराजांबद्दल प्रेम असेल तर पंतप्रधानांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा असे प्रतिपादन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले.तर छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त आपलेच नव्हे तर अवघ्या जगाचे दैवत आहेत. कर्नाटकात झालेली पुतळ्याची विटंबना ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. याबाबत भाजपचे सरकार गंभीर नाही याचा अर्थ महाराजांवरील त्यांचे प्रेम बेगडी आहे. बहिरे आणि मुके असलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी आज आम्ही पक्षाच्या आदेशाप्रमाणे शांततेत निषेध करत आहोत. भविष्यात अशी घटना घडली तर आम्ही शांत बसणार नाही.असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण  पौळ यांनी दिला.

        यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीताताई तुपसागर, सुरेश टाक, राजेंद्र सोनी, वैजनाथ सोळंके, शंकर कापसे, रमेश आण्णा भोईटे, दिनेश गजमल, माधव मुंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार