MB NEWS-बार्टीची अधिछात्रवृत्ती: संशोधक विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावा -खा.डॉ.प्रीतम मुंडे

 बार्टीची अधिछात्रवृत्ती: संशोधक विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी  लावा -खा.डॉ.प्रीतम मुंडे


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी परळीत चालू असलेल्या बर्टीच्या अधिछात्रवृत्ती प्रश्नावर संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली.  परळीत चालू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष देऊन त्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी केली. बार्टीच्या विद्यार्थ्यांच्या छत्रवृत्तीच्या बाबीचा माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना सांगून पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावू असेही आश्वासन दिले. परळीत चालू असलेल्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे.

         विद्यापीठ अनुदान आयोग भारत सरकारच्या नियमाप्रमाणे एम.फिल. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना सलग पाच वर्षे पीएच. डी. पर्यंत फेलोशिप देण्यात येते. परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) च्या माध्यमातुन देण्यात येणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF – 2018) मात्र एम.फिल. या अभ्यासक्रमासाठी दोनच वर्षे दिली जात आहे. शिवाय पीएच.डी. साठी सलग अधिछात्रवृत्ती देण्यापासुन वंचित ठेवत असल्याने अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. मागील अनेक वर्षापासुन या मागणीचा लोकशाही मार्गाने पाठपुरावा करत आहोत. परंतु आमच्यावरील अन्याय दूर होत नसल्याने सामाजिक न्याय विभागाचे व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे असे या आंदोलकांनी सांगितले.आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे.

वकील संघाचा आंदोलनाला पाठींबा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या माध्यमातून देण्यात येणारी आधीछात्रवृत्ति एमफिल ते पीएचडी अशी नियमित करण्यात यावी यासाठी परळीत साखळी उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणाला परळी वकील संघाने आज पत्र देऊन पाठिंबा जाहीर केला. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष पी.एम.सातभाई ज्येष्ठ विधिज्ञ जीवनराव देशमुख, संजय फुन्ने, मिर्झा, जाधव यांच्यासह सर्व वकील बांधव उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !