MB NEWS- *आझाद मैदानावरओबीसीच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी जन मोर्चाच्या वतीने लाक्षणिक उपोषण!* *ओबीसीच्या मागण्यांचा सरकारने त्वरित विचार करावा— प्रा. टी. पी. मुंडे*

 *आझाद मैदानावर ओबीसीच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी जन मोर्चाच्या वतीने लाक्षणिक उपोषण!*

*ओबीसीच्या मागण्यांचा सरकारने त्वरित विचार करावा— प्रा. टी. पी. मुंडे*



परळी वैजनाथ /प्रतिनिधी 


राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळल्यानंतर ओबीसी जन मोर्चाच्या वतीने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ओबीसीच्या न्यायिक मागण्यांचा राज्य सरकारने गंभीरपूर्वक विचार करण्याची गरज आहे असे प्रतिपादन ओबीसी जन मोर्चाचे उपाध्यक्ष प्रा.टी.पी. मुंडे सर यांनी केले.


 ओबीसी जन मोर्चाच्या वतीने ओबीसींच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ओबीसी जनमोर्चा चे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे, कार्याध्यक्ष अँड. चंद्रकांत बावकर ,जे. डी.तांडेल, लक्ष्मण गायकवाड, दशरथ पाटील, गजानन सुवरे आदीसह ओबीसी च्या विविध संघटना त्यांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

    स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे राजकीय आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती  दिल्यामुळे ओबीसी समाजातील जातींचे नुकसान झाले आहे तसेच राज्य शासनाने एम्पिरिकल डाटा लवकरात लवकर गोळा करावा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकला व्यात, ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करावी, मागास आयोगाकडून एम्पिरिकल डाटा त्वरित गोळा करावा आदीसह प्रमुख मागण्या तसेच विविध मागण्यांसंदर्भात उपोषण करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार