MB NEWS-राशिभविष्य (दि. ११ डिसेंबर २०२१)

 राशिभविष्य (दि. ११ डिसेंबर २०२१)


मेष-नव्या जोमाने कामाला सुरुवात कराल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. लाभदायक दिवस. प्रवासाचे योग संभवतात. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल.

वृषभ-मनासारख्या गोष्टी होतील. प्रयत्नांना यश मिळेल. पदोन्नती होईल. गृहसौख्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.

मिथुन-रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज. प्रतिष्ठा पणाला लागेल. अनावश्यक खर्च होईल. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे. नियोजित कामांमध्ये अडचणी येतील.

कर्क-अपयशाने खचू नका. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. वाद-विवादापासून दूर राहा.


सिंह-इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. सज्जनांचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल.


कन्या- आरोग्य उत्तम राहील. चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. धनप्राप्तीचे योग संभवतात. संधीचे सोने कराल.


तूळ-निर्णय घेताना सावधानता बाळगा. वादविवादापासून दूर राहा. कामांचे नियोजन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. एकाग्रता आवश्यक आहे.


वृश्चिक-अनावश्यक भीती बाळगू नका. आहारावर नियंत्रण आवश्यक आहे. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. वाहने सावकाश चालवा. संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे.


धनु-आवडत्या मित्रमंडळींच्या सहकार्याने लाभ होतील. कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक प्रगती होईल. खरेदीचे योग संभवतात. प्रयत्नांना यश मिळेल.


मकर-लोकांच्या नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करा. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. वस्तू सांभाळून ठेवा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.


कुंभ- भाग्यकारक घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रसन्नता लाभेल. आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल. मनपसंद खरेदीचा दिवस.


मीन-आळस कुटुंबाचा वैरी. आळस सोडायला हवा. स्वावलंबन आवश्यक आहे. कामांचे नियोजन करा. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार