MB NEWS- *नेत्रदीपक आयोजनात,वेदोक्त पद्धतीने थाटामाटात मांडवा येथील श्री. काळभैरव देवस्थानचा कलशारोहन सोहळा व यात्रा उत्सव* 🕳️ _दर्शनार्थी हजारो भक्तगणांच्या मांदियाळीने मांडव्याला आले 'धाकट्या पंढरीचे' रूप_

 *नेत्रदीपक आयोजनात, वेदोक्त पद्धतीने थाटामाटात मांडवा येथील श्री. काळभैरव देवस्थानचा कलशारोहन सोहळा व यात्रा उत्सव* 

🕳️ _दर्शनार्थी हजारो भक्तगणांच्या मांदियाळीने मांडव्याला आले 'धाकट्या पंढरीचे' रूप_

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       तालुक्यातील मांडवा येथील जाज्वल्य देवस्थान म्हणून ओळख असलेल्या काळभैरव देवस्थानचा पारंपारिक यात्रा उत्सव शानदार पद्धतीने पार पडला. विशेष म्हणजे या वर्षीच्या सोहळ्यात काळभैरव मंदिराचा कलशारोहण समारंभ व त्या निमित्ताने आयोजित राम कथा, कीर्तन महोत्सव,कलश प्रदक्षिणा, पालखी सोहळा यामुळे अतिशय थाटामाटात व दिमाखदार पद्धतीने सप्ताह साजरा झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीने मांडवा व परिसर फुलून गेला होता. एक प्रकारे मांडव याला 'धाकट्या पंढरीचे' रूप आल्याचे पाहायला मिळाले.

   परळी पासून अगदी जवळच असलेल्या मांडवा येथे दरवर्षी काळभैरव यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न होतो. तेलंगणा, आंध्र प्रदेश व संपूर्ण महाराष्ट्रभरातून या यात्रेला व काळभैरव दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. अतिशय भव्य दिव्य व देखणे मंदिर या ठिकाणी उभारण्यात आले असून परळी तालुक्यातील एक उत्कृष्ट देवस्थान म्हणून मांडवा येथील काळभैरव मंदिर ओळखले जात आहे. या भव्य दिव्य मंदिराचा कलशारोहण समारंभ आज दिनांक 19 रविवार रोजी वेदोक्त मंत्र उच्चारण व विधीवत पद्धतीने पार पडला. यानिमित्ताने गेल्या सप्ताहात आयोजित करण्यात आलेल्या प्रसिद्ध रामायणाचार्य ह भ प रामराव महाराज ढोक यांच्या रामकथेचे ची सांगता झाली. मंदिराचा कलशारोहण समारंभ सकाळच्या सत्रात प्रारंभ झाला. वेदोक्त व शास्त्रोक्त विधीने ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात कलशारोहण समारंभ झाला. याप्रसंगी ह भ प अर्जुन महाराज लाड, ह भ प केशव महाराज उखळीकर, हभप प्रभाकर महाराज झोलकर आदी वारकरी संप्रदायातील संत महंतांची उपस्थिती होती. 




          आंध्र, तेलंगाना या भागातील भाविक मोठ्या संख्येने मांडवा येथे दाखल झाले होते.हजारो भाविकांच्या उपस्थितीत कलशाची नगर प्रदक्षिणा झाली. सवाद्य मिरवणुकीने कलश मिरवणूक व काळभैरवनाथाचा पालखी सोहळा पार पडला. रामायणाचार्य ह भ प रामराव महाराज ढोक यांच्या काल्याच्या कीर्तनाने या समारंभाचा समारोप झाला. गेल्या सात दिवसापासून नामवंत कीर्तनकारांची कीर्तने, हरी भजनाचा निनाद, हजारोंच्या संख्येने लोटलेला जनसागर यामुळे काळभैरव मंदिर व मांडवा गावाला एक प्रकारे 'धाकट्या पंढरीचे' स्वरूप आल्याचे बघायला मिळाले. या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. नेत्रदीपक नियोजन व दिमाखदार सोहळ्यात काळभैरव मंदिराचा कलशारोहण समारंभ झाला. विविध स्तरातील नागरिक, भाविक यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी समस्त गावकरी मंडळ मांडवा यांनी अथक परिश्रम घेतले.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !