MB NEWS-श्री.पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात “करिअर कट्टा” फलकाचे अनावरण

 श्री.पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात “करिअर कट्टा” फलकाचे अनावरण

सिरसाळा  :- येथील श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयाच्या सैनिकशास्त्र विभाग, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने "करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी" या उपक्रमाच्या नामकरण फलकाचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. पी. कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी समन्वयक डॉ के. एम. नागरगोजे यांनी आय.ए.एस. आपल्या भेटीला, उद्योजक आपल्या भेटीला, सायबर सेक्युरिटी इत्यादी उपक्रमाची माहिती देऊन करियर कट्टा योजनेचे ध्येय व कार्यप्रणाली विद्यार्थ्यांना समजून सांगितली.

सर्व विद्यार्थ्यांनी करियर गटाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प केला. 

 याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दयानंद झिंजुर्डे यांनी केले.

याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार