MB NEWS-महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित श्री.संत संताजी जगनाडे महाराज पालखी रथयात्रा शुक्रवारी परळीत*

 *महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित श्री.संत संताजी जगनाडे महाराज पालखी रथयात्रा शुक्रवारी परळीत*



परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)

     महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने

संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी रथयात्रेचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले आहे. या यात्रेची बीड जिल्ह्यातील सुरुवात परळी पासुन होणार असून या यात्रेच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व संपूर्ण तेली समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

        महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभे तर्फे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनापासून ८ डिसेंबर २०२१ ते १४ जानेवारी २०२२ दरम्यान श्री क्षेत्र सुदुंबरे येथून खासदार रामदास तडस, अशोक व्यवहारे, डाॅ.कर्डिले,श्री गजनान शेलार यांच्या उपस्थितीत श्री संत संताजी जगनाडे महाराज रथयात्रेची सुरुवात झाली असून ही रथ यात्रा शुक्रवारी (ता.१७) परळीत येणार आहे. यानिमित्ताने आंबेजोगाई रस्त्यावरील आझाद चौकात ढोलताशांच्या गजरात स्वागत करुन दुचाकी, चारचाकी रँली काढण्यात येणार आहे. तसेच ही रँली शहरातील प्रमुख मार्गावरून शनी मंदिरात आल्यानंतर समाजास रँलीत सहभागी मान्यवर  मार्गदर्शन करणार आहेत. या पालखी रथासोबत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष खासदार रामदास तडस, कार्याध्यक्ष  अशोक काका व्यवहारे ,महासचिव डॉ. भूषण कर्डिले, कोषाध्यक्ष श्री गजानन नाना शेलार, युवाध्यक्ष श्री संदिपभैय्या क्षीरसागर,सेवा आघाडी अध्यक्ष श्री सुभाष पन्हाळे, समन्वयक श्री सुनील चौधरी, युवा आघाडीचे महासचिव श्री नरेंद्र चौधरी यांचेसह विविध विभागातील महाराष्ट्र प्रांतिक महासभेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी आपापसातील सर्व जाती, पोटजाती व संघटना मतभेद विसरून आपले दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचे पालखीचे जोरदार स्वागत करावे व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व संपूर्ण तेली समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !