MB NEWS-फायनान्सच्या वसुली कर्मचाऱ्याचे दुर्वर्तन; बचत गटातील एका महिलेची केली बदनामी: विनयभंगाचा गुन्हा दाखल

 फायनान्सच्या वसुली कर्मचाऱ्याचे दुर्वर्तन; बचत गटातील एका महिलेची केली बदनामी: विनयभंगाचा गुन्हा दाखल

परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

     शहरातील एका महिला बचत गटाच्या सदस्या असलेल्या विवाहित महिलेची ओळख वाढवून, बळजबरीने सोबत फोटो काढून तिच्या बदनामी च्या हेतूने फोटो नातेवाईकांना पाठवले व बदनामी केली म्हणून एका फायनान्सच्या वसुली कर्मचाऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळी शहरातील रहिवासी असलेल्या एका ३१ वर्षिय महिलेने एका फायनान्सच्या वसुली कर्मचाऱ्याविरुद्ध विनयभंगाची फिर्याद दिली आहे. ऋषिकेश राधाकिशन वाघ या.किनगाव ता.अहमदपुर जि.लातुर असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी महिला या एका बचतगटाच्या सदस्या आहेत.संबंधित फायनान्स मधुन या बचतगटाने अर्थिक सहयोग घेतला .त्याची वसुली करण्याच्या माध्यमातून आरोपी व फिर्यादी यांची ओळखपाळख झाली. लाॅकडाउनच्या काळात वसुली कुठे जमा करायची यासाठी दरवेळी फोन करणे व विशिष्ट ठिकाणी यायला सांगणे असा प्रकार सुरू होता या दरम्यान या आरोपीने घरणीकर रोडवर फिर्यादी महिलेला बोलावले व बळजबरीने ओढून फोटो घेतले.या फोटोंच्या माध्यमातून वारंवार मला फोनवर बोलत रहा अन्यथा फोटो नवर्याला व नातेवाईकांना पाठवतो अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने सतत परेशान केले. त्याच्याशी बोलणे बंद केल्यानंतर आरोपीने हे फोटो नातेवाईकांना व बचतगटाच्या महिलांना पाठवुन बदनामी केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पो.नि.उमाशंकर कस्तुरे हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार